Woman Saree Gets Stuck On Train Doors: दिल्ली मेट्रोच्या दरवाजात साडी अडकल्याने 35 वर्षीय महिलेचा मृत्यू
Delhi Metro (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

Woman Saree Gets Stuck On Train Doors: दिल्लीच्या इंद्रलोक मेट्रो स्टेशन (Delhi Indralok Metro Station) वर ट्रेनने धडकलेल्या 35 वर्षीय महिलेचा शनिवारी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) च्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, रीना नावाच्या महिलाची साडी गुरुवारी मेट्रो ट्रेनच्या दरवाजात अडकली. ज्यामुळे ती खाली पडली. यात महिला गंभीर जखमी झाली होती.

याप्रकरणी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना घटनेची चौकशी करण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त करणार आहेत. सीएमआरएस ही घटना कशी घडली? महिला प्रवाशाची साडी दरवाजात कशी अडकली? यावेळी मेट्रोचा दरवाजा सेन्सर का काम करत होता की, नाही? याची चौकशी करणार आहे. तपास अहवालाच्या आधारे, डीएमआरसी महिलेला भरपाई देण्यासह मेट्रोमधील प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी पावले उचलणार आहे. (हेही वाचा - Delhi Metro Reels Ban: दिल्ली मेट्रोमध्ये आता Reels बनवणाऱ्यावर बंदी, DMRC ने हटके अंदाजात दिला इशारा)

सध्या, डीएमआरसीने मृत महिलेच्या आश्रितांना कोणतीही भरपाई जाहीर केलेली नाही. या संदर्भात प्रश्न विचारला असता, डीएमआरसीने कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. 21 वर्षांच्या मेट्रो ऑपरेशनमध्ये पहिल्यांदाच कपड्यांमुळे मेट्रोच्या दरवाजात अडकून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (हेही वाचा - Delhi Metro Pole Dance Viral Video: दिल्ली मेट्रोत रोमान्स नंतर चक्क 'हे' पाहायला मिळतेय ? पोल डान्सचा व्हिडिओ पाहताच नेटकरी संतापले (Watch Video))

प्रवाशांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे. दिल्ली मेट्रोचे 350 किलोमीटरचे नेटवर्क आणि 256 मेट्रो स्टेशन आहेत. काही गर्दीचे मेट्रो स्थानक सोडले तर कोणत्याही स्थानकाच्या फलाटावर सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी उपस्थित नाहीत.