रेल्वे स्थानकात मोबाईल चार्जिंग करणे पडेल महागात, SBI कडून ग्राहकांना पूर्वसुचना देत सावधगिरीचा इशारा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सध्याच्या दिवसात बहुतांश लोक फोनवरच अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. हेच कारण आहे की लोक जरा वेळ सुद्धा मोबाईल हातामधून खाली ठेऊ शकत नाहीत. परिणामी मोबाईलची बॅटरी कमी होऊन तो वारंवार चार्जिंग करावा लागतो. सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच रेल्वे स्थानक, विमानतळ, रेल्वे, हॉटेलमध्ये मोबाईल अत्यंत सहजपणे चार्जिंग केला जातो. मात्र जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी तुमचा स्मार्टफोन चार्जिंग करत असल्यास जरा सावध व्हा. कारण तुम्ही अशावेळी सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतात. देशातील सर्वात मोठ्या बँकेने म्हणजेच एसबीआयने त्यांच्या ग्राहकांना सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंग लावण्यापूर्वी सुचना देत सावधगिरीची इशारा दिला आहे.

एसबीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटवर ट्वीट करत असे म्हटले आहे की, जर तुम्ही स्मार्टफोन रेल्वे स्थानकात चार्ज करत असल्यात त्याबाबत आधी विचार करा, कारण तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस पाठवून तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचा पासवर्ड आणि मोबाईल मधील अन्य डेटा चोरी केला जातो. एसबीआयने ग्राहकांना सल्ला देत सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंग करण्यापासून दूर रहावे असे आवाहन केले आहे. खरंतर हॅकर्स जूस जॅकिंगच्या माध्यमातून तुमच्या फोनमधील महत्वाचा डेटा चोरी करुन तुमचे बँक खाते खाली करु शकतात.(खुशखबर! SBI बँकेचे कर्ज 10 टक्क्यांनी स्वस्त, आजपासून लागू होणार नवीन व्याजदर)

काय आहे जूस जॅकिंग?

जूस जॅकिंग हा एक प्रकारचा सायबर हल्ला समजला जातो. त्यामध्ये चार्जिंग पोर्टमध्ये गुप्तपणे इलेक्ट्रिक डिवाइस लावण्यात येते. ज्या वेळी एखादा व्यक्ती सार्वजनिक जागेवर फोन चार्जिंगला लावतो त्यावेळी डिवाइसच्या मदतीने युजर्सच्या फोनवर व्हायरस पाठवून तो इन्स्टॉल केला जातो. त्यामुळे युजर्सचा डेटा चोरी करणे अत्यंत सहज होऊन जाते.

कशा प्रकारे बचाव कराल?

एसबीआयने लोकांना या समस्येपासून बचाव करण्यासाठी काही टीप्स दिल्या आहेत. त्यानुसार युजर्स जुस जॅकिंगपासून स्वत:हून बचाव करु शकतात. बँकेने सल्ला देत असे म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी फोन चार्जिंग करण्यापूर्वी त्याच्या इलेक्ट्रिक बोर्डाच्या पाठी अन्य दुसरा कोणता सॉकेट लावला आहे की नाही. त्याचसोबत शक्यचो स्वत:चे चार्जिंग केबल वापरावे.