खुशखबर! SBI बँकेचे कर्ज .10 टक्क्यांनी स्वस्त, आजपासून लागू होणार नवीन व्याजदर
Representational Image (Photo Credits: PTI)

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) ने ग्राहकांसाठी एक आनंद वार्ता आणली आहे. SBI ने आपल्या कर्जावरील व्याजदरात पुन्हा एकदा कपात केली आहे. टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, MCLR आधारित कर्जांवरील व्याजदर स्टेट बँकेने .10 टक्क्यांनी घटवले आहेत. यामुळे एमसीएलआर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जाचा व्याजदर आता 7.9 झाला आहे. दोन व तीन वर्षे मुदतीच्या कर्जांवरील नवे व्याजदर अनुक्रमे 8.10 व 8.20 असतील. नवीन व्याजदर आजपासून लागू होतील. या निर्णयामुळे गृहकर्जदारांना खूप फायदा होणार आहे.

डिसेंबर व जानेवारी या महिन्यांचे पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवले होते. मात्र यानंतरही स्टेट बँकेने कर्जांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात या बँकेने केलेली ही आठवी दरकपात आहे. 'बँकेच्या निधी व्यवस्थापनावरील खर्च घटल्याने तो लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही दरकपात केली आहे', असे स्टेट बँकेने म्हटले आहे.

हेदेखील वाचा- SBI YONO Shopping Festival यंदा 10-14 डिसेंबर; 50% पर्यंत सवलत ते होम लोन, ऑटो लोन वर मिळणार ही 'बंपर सूट'!

SBI च्या या व्याजदर कपातीचा लाभ गृहकर्जदारांना होणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले अन्य बँकेचे गृहकर्ज स्टेट बँकेकडे वर्ग केल्यास गृहकर्जावरील हप्त्यात मोठी बचत होऊ शकेल.

 

याआधी मागे 10 सप्टेंबरला SBI ने गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली होती. MCLR रेट 8.25 टक्के कमी होऊन 8.15 टक्क्यांवर करण्यात आले होते. एमसीएलआर मध्ये करण्यात आलेली ही कपात 10 सप्टेंबर पासून लागू करण्यात आली होती. तसेच अन्य बँकांसुद्धा याच मार्गाचा अवलंब करताना दिसून येतील. यामुळे होम लोन वरील व्याजदर कमी होताना दिसेल.