YONO Shopping Festival | Photo Credits: SBI Twitter Account

YONO Shopping Festival Offers: भारतातील सर्वात मोठी बॅंक अशी ओळख असलेल्या एसबीआय (State Bank of India) बॅंकेने आता ग्राहकांसाठी नव्या शॉपिंग फेस्टिवलची घोषणा केली आहे.YONO Shopping Festival (YSF) असं या शॉपिंग फेस्टिवलचं नाव असून 10-14 डिसेंबर दरम्यान एसबीआय ग्राहकांना विविध गोष्टींवर डिस्काऊंट ऑफर दिल्या जाणार आहेत. यामध्ये कॅशबॅक आणि अन्य ऑफर्सचादेखील समावेश आहे. तसेच एसबीआय ग्राहकांना त्यांच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डवर खास सूट मिळणार आहे. मग जाणून कसा असेल हा YONO Shopping Festival?

YONO Shopping Festival ची वैशिष्ट्यं

  • योनो शॉपिंग फेस्टिवल हा केवळ एसबीआय बॅंकेच्या डिजिटल अ‍ॅप प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.
  • योनो शॉपिंग फेस्टिवल 10-14 डिसेंबर दरम्यान असेल.
  • एसबीआय सोबत असलेल्या 17 मर्चंटाईजेसवर ग्राहकांना 50% पर्यंत सवलत मिळू शकते.
  • कॅशबॅक ऑफरचा फायदा मिळवण्यासाठी ग्राहकांना किमान 1000 रूपयांचा व्यवहार करणं आवश्यक आहे. या फेस्टिवल ऑफरमध्ये 2500 रूपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाणार आहे.
  • एसबीआय ग्राहक डेबिट आणि क्रेडीट धारकांना 10% अधिक कॅशबॅक मिळेल.
  • 31 डिसेंबरपर्यंत एसबीआय ग्राहकांना ऑटो लोनवर प्रोसेसिंग फी माफ आहे.
  • होम लोन वर लागणार्‍या प्रोसेसिंग फी वरदेखील 50% सूट दिली जाईल. सोबतच तात्काळ इन प्रिंसिपल अप्रूवल देखील मिळेल.

SBI Tweet 

मागील वर्षीदेखील एसबीआयकडून अशाप्रकारे शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले होते. त्यालादेखील ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मग यंदा तुम्हांला नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शॉपिंग करायची असेल तर या फेस्टिवलमध्ये नक्की ऑफर्स पाहून त्याचा फायदा घ्या. एसबीआय बॅंकेचे योनो अ‍ॅप तुम्हांला गूगल प्ले स्टोअरवर मोफत डाऊनलोड करता येईल.