गुरुग्राम येथे बार डान्सरची हत्या, पोलिसांकडून अधिक तपास सुरु
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

गुरुग्राम (Gurugram) येथे एका बार डान्सर (Bar Dancer) ची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. शनिवारी रात्री या 22 वर्षीय बार डान्सरचा मृतदेह खुशबु चौक येथे आढळून आला. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

बार डान्सरचे काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. तर डान्स बार बाहेर असणाऱ्या बाऊंन्सर्सने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडित तरुणीने त्याला नकार दिल्याने बाऊंन्सर्स संदिप कुमार याने तिच्यावर गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. एनआयने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपायुक्त शमशेर सिकंदर यांना सुमारे 6.30 वाजताच्या सुमारास खुशबु चौक येथे या तरुणीचा मृतदेह आढळून आला. तसेच रात्री डान्स बारमध्ये काम करण्यासाठी तरुणी आली तेव्हा संदिप कुमार डान्स बार बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी आरोपी सिंकदर याने पोलिसांनी अटक करण्यापूर्वी स्वत: आत्महत्या केली. पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत असून पीडित तरुणीच्या आईने आरोपी सिंकदर ह्याने यापूर्वी ही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असल्याच सांगितले आहे.