श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Shree Ram Janmabhoomi Trust) सरचिटणीस चंपत राय (Champat Rai) यांच्या माहितीनुसार, सुरु असणार्या पंधरवडय़ातील ‘पितृपक्ष’ (Pitru Paksh) संपल्यानंतर 17 सप्टेंबर पासुन अयोध्येत (Ayodhya( राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. बांधकाम कंपनी लार्सन आणि टुब्रो अयोध्येतील 12 हजार 879 चौरस मीटर च्या क्षेत्रात राम मंदिराचा भव्य पाया रचण्यासाठी तयार आहे. विशेष म्हणजे कोणतेही शुल्क न आकारता कंंपनी काम करणार आहे. मंंदिराच्या पायासाठी जमीनीत 100 फुट खाली 1200 खांंब बांंधले जाणार आहेत. यातील एकही खांंब हा लोखंंडाचा वापर करुन बनवलेला नसेल यामध्ये संपुर्णतः दगडी बांंधकाम असणार आहे अशीही माहिती मंंदिरातर्फे देण्यात आली आहे. हा पाया पुर्ण होताच त्यावर आणखीन एक थर घातला जाणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शेअर केले राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडलचे खास फोटोज! (See Pics)
प्राप्त माहितीनुसार, या कामासाठी बांधकाम कंपनीने मुंबईहून मशीन्स आणलेल्या आहेत. हैदराबादहून सुद्धा सोर्सिंग मशीन आणल्या जात आहेत, या कामात जवळपास 100 कामगार जोडले जाणार आहे.रामजन्मभूमी परिसरात प्रवेश करण्यापूर्वी या मजुरांची कोरोना व्हायर लक्षणांंची तपासणी व थर्मल स्कॅन केले जाणार आहे. ट्रस्टच्या मते, मंदिराची पायाभरणी आधुनिक तंत्राचा वापर करून केली जाईल जेणेकरून ते 1,500 वर्षांहून अधिक वर्षे मंंदिराची रचना टिकून राहू शकेल.
दरम्यान, मंदिराच्या विषयी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची 161 फूट इतकी असणार आहे, मंदिराच्या भिंती 6 फुटांच्या दगडांनी बांधल्या जातील. मंदिराला एकूण पाच कळस व पाच प्रवेशद्वार असणार आहेत. मंदिराचा दरवाजा संगमरवर दगडाचा असेल. श्रीमंदिर उभारणीचं काम पूर्ण होण्यासाठी 36-40 महिन्यांचा कालावधी लागणं अपेक्षित आहे.