Ram Mandir Proposed Model: श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शेअर केले राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडलचे खास फोटोज! (See Pics)
Proposed Model of Ram Temple (Photo Credits: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

अयोध्या (Ayodhya) येथील राम मंदिराचे (Ram Mandir) भूमीपूजन उद्या बुधवार, 5 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने (Ram Janmbhoomi Teerth Kshetra) मंदिराच्या प्रस्तावित मॉडेलचे (Proposed Model) काही फोटोज ट्विटरवर शेअर केले आहेत. मंदिराचे हे मॉडेल म्हणजे भारतीय वास्तुस्थापत्य कलेचे अनोखे उदाहरण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मंदिराच्या शिलान्यासाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बाबरी मशिद पक्षकार इकबाल अन्सारी यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच श्रीरामजन्मभूमी ट्रस्टला पत्र; राम मंदिरासाठी शिवसेनेकडून 1 कोटींचे योगदान)

पहा फोटोज:

उद्या दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजनाच्या ठिकाणी पोहचण्याची शक्यता आहे. कार्यक्रमासाठी तब्बल 175 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान कोविड-19 च्या संकटामुळे विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला खास पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी राम मंदिरासाठी 1 कोटींचे योगदान शिवसेना पक्षाकडून देण्यात आल्याचे म्हटले आहे. तसंच राममंदिरासाठी शिवसैनिकांनी दिलेल्या योगदानाचाही उल्लेख केला आहे.