CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

अयोध्या (Ayodhya) येथील राम मंदिर (Ram Mindir) भूमिपूजनाचा सोहळा बुधवार, 5 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जाणार की नाहीत यावर चर्चा रंगत असताना आता मुख्यमंत्र्यांनी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

पत्रात मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, "5 ऑगस्ट 2020 रोजी श्रीराम मंदिराचा श्रीगणेशा होणार आहे. करोडो हिंदू या ऐतिहासिक क्षणाची प्रतिक्षा करत होते. माझीही श्रीरामावर अगाध श्रद्धा आहे. मी अयोध्या यात्रेदरम्यान शिवसेना पक्षाकडून 1 कोटींचे योगदान देण्याचा संकल्प केला होता. या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, खाता. क्र. 39161495808(स्टेट बँक ऑफ इंडिया, अयोध्या 2510 शाखा) येथे 27 जुलै 2020 रोजी आरटीजीएसच्या माध्यमातून जमा केली आहे." (बाबरी मशिद पक्षकार इकबाल अंसारी यांंना अयोध्या राम जन्मभूमी मंदिर भूमीपूजन कार्यक्रमाचे पहिले आमंंत्रण, Invitation Card ची पहिली झलक पाहा)

शिवसेना ट्विट:

तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहानानंतर हजारो शिवसैनिकांनी अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला होता याचीही आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रातून करुन दिली आहे.

5 ऑगस्ट रोजी रंगणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याची जय्यत तयारी अयोध्येत सुरु झाली आहे. तसंच राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाची पहिली झलक आज समोर आली.