पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंच्या हस्ते 5 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजुन 30 मिनिटांनी राम जन्मभूमी मंदिराचे भूमी पूजन (Ram Janmabhoomi Bhumi Pujan) होणार आहे, तत्पुर्वी आता अयोध्या (Ayodhya) नगरीत जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्या राम जन्मभुमी मंदिर भुमीपुजन कार्यक्रमाच्या आमंंत्रण पत्रिका वाटायला सुरुवात झाली आहे, प्राप्त माहितीनुसार ही पहिली आमंंत्रण पत्रिका अयोध्या राम मंदिर जमीन वादातील बाबरी मशिद पक्षकार माजी वकील इक्बाल अंसारी (Iqbal Ansari) यांना देण्यात आली आहे. आपण खाली दिलेल्या फोटो मध्ये पाहु शकता की, आमंंत्रण पत्रिका ही पिवळ्या बॅकग्राउंडवर बनवण्यात आली आहे. यात राम लल्लांंची एक छोटी प्रतिमा आहे. यात पंंतप्रधान नरेंद्र मोदी , आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) , उत्तर प्रदेशचे मुख्यमंंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath), राज्यपाल आनंंदी पटेल (UP Governor Aanandi Patel) यांची नावे सुद्धा टाकण्यात आली आहेत.
राम जन्मभुमी मंंदिराच्या पायाभरणी समारंभाचे निमंत्रण स्वीकारताना "मला प्रथम आमंत्रण मिळावे ही भगवान रामांची इच्छा होती असे म्हणत अंसारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ANI या वृत्त संस्थेने शेअर केलेल्या फोटोमध्ये या आमंत्रण पत्रिकेची पहिली झलक पाहायला मिळत आहे.कोरोनाचे संकट लक्षात घेता अवघ्या 200 जणांनाच या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
राम जन्मभुमी मंंदिर भुमीपुजन कार्यक्रम आमंत्रण पत्रिका
Iqbal Ansari, the main litigant in the Ayodhya land dispute case, gets invitation card for Ram Mandir #BhoomiPoojan pic.twitter.com/SW55Ub3Xn7
— Samarth (@samsrivastava31) August 3, 2020
दरम्यान, भूमिपूजन' होण्याआधी, विधींची आज अयोध्येत विस्तृत 'गौरी गणेश' पूजनाने सुरुवात झाली. यावेळी बोलताना संत समितीचे महाराज कन्हैया दास यांनी, भगवान गणेशाच्या आशीर्वादामुळे आता मंदिर कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.