Ayodhya Ram Mandir: राम जन्मभूमी मंदिराच्या भूमी पूजन सोहळ्याआधी 'अशी' सजली अयोध्या नगरी (Watch Video)
Ayodhya Ram Janmabhoomi Mandir Bhumipujan (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंच्या हस्ते 5 ऑगस्ट ला राम जन्मभूमी मंदिराचे भूमी पूजन (Ram Janmabhoomi Bhumi Pujan)  होणार आहे, तत्पुर्वी आता अयोध्या (Ayodhya)  नगरीत जोरदार तयारी सुरु आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांंच्या देखरेखीखाली अयोध्येत संंपुर्ण तयारीला सुरुवात झाली आहे. अनेक भागात काल म्हणजेच शनिवारी, दिवे लावुन रंंगबेरंगी लाईट्स लावुन सुशोभन करण्यात आले होते. अयोध्येत येणार्‍या रस्त्याची लांबी वाढवण्याचे काम सुद्धा नुकतेच पार पडले होते. केवळ सुशोभीकरणाचेच नव्हे तर कोरोनाचे संंकट (Coronavirus) लक्षात घेता, सॅनिटायझेशन करण्यापासुन ते कोविड 19 ला प्रतिबंधक सर्व उपाययोजना राज्यात राबवण्यात येत आहेत. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्या नगरी व जनता अत्यंंत उत्साहात असल्याचे एका नागरिकाने ANI शी बोलताना सांगितले होते.

भूमीपूजनासाठी गंगा, यमुना आणि सरस्वतीचा त्रिवेणी संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणली जाणार आहे. तर 150 हुन अधिक नद्यांचे पाणी गोळा करणारे दोन भाऊ सुद्धा नुकतेच अयोध्येत पोहचले आहेत. राधे श्याम पांंडे यांनी सांगितल्याप्रमाणे, 1968 पासुन हे दोन भाऊ श्रीलंंकेपासुन ते अयोध्येपर्यंत 151 नद्यांचे पाणी गोळा करत आहेत. हे पाणी अयोध्या राम जन्मभुमी मंंदिर बांंधकामात वापरले जाणार आहे.

अयोध्येत राम जन्मभुमी मंंदिर भुमीपुजनाची तयारी

5 ऑगस्ट च्या कार्यक्रमाविषयी समोर आलेल्या माहिती नुसार, पंंतप्र्धान नरेंद्र मोदी हे हनुमानगढ़ी येथे सर्वात आधी दर्शन घेतील, भुमीपुजनासाठी 7 मिनिटांंचा वेळ देण्यात येणार आहे यातील 3 मिनिटे पुजा पार पाडली जाईल. आज ही सगळी व्यवस्था पाहण्यासाठी मुख्यमंंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येत जाणार होते मात्र आज उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंंत्री कमला वरुण यांंचे कोरोनामुळे निधन झाल्याने हा दौरा रद्द करण्यात आले आहे.

दरम्यान, मंदिराच्या विषयी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची 161 फूट इतकी असणार आहे, मंदिराच्या भिंती 6 फुटांच्या दगडांनी बांधल्या जातील. मंदिराला एकूण पाच कळस व पाच प्रवेशद्वार असणार आहेत. मंदिराचा दरवाजा संगमरवर दगडाचा असेल.