अयोध्या राम जन्मभूमी मंदिर जमिनीखाली टाइम कॅप्सूल पुरण्याचे वृत्त चुकीचे; मंदिराच्या ट्रस्टने दिले 'हे' स्पष्टीकरण
Ayodhya Shri Ram Janmabhoomi Mandir (Photo Credits: Twitter)

अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) भूमी पूजनानंतर बांधकाम सुरु होताच, मंदिराच्या जमिनीखाली 2000 फूट खोल टाइम कॅप्सूल (Time Capsule) ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त आपण ऐकले असेल. वास्तविक ही माहिती ANI या वृत्त संस्थेच्या माध्यमातून राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य रामेश्वर चौपाल यांच्या हवाल्याने देण्यात आली होती मात्र आता ही माहिती चुकीची असल्याचा दावा राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय (Champat Rai) यांनी केला आहे. टाइम कॅप्सूल बाबत मंदिर बांधकाम करणाऱ्या संस्थेने काहीही निर्णय घेतलेला नाही, माध्यमात दाखवले जाणारे वृत्त चुकीचे आहे असे स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोद्धा राम मंदिर भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण.

काय होते जुने वृत्त?

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य रामेश्वर चौपाल यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर ज्या जमिनीवर उभारले जाणार आहे त्याच्या 2000 फूट खाली जमिनीत एक टाइम कॅप्सूल (Time Capsule) पुरून ठेवली जाणार आहे. ही टाइम कॅप्सूल म्हणजे आताच्या सर्व घडामोडीची माहिती असेल, भविष्यातील पिढ्यांना मंदिर आणि त्याच्या इतिहासाविषयी माहिती देण्यासाठी ही कॅप्सूल उपयोगी ठरेल तसेच वर्तमानातील विविध घटनांविषयी यामध्ये नमूद केले जाणार आहे ही माहिती पुढील काळात आताच्या मानवी इतिहासाचा पुरावा असेल असे कालच्या वृत्तात सांगण्यात आले होते. (अयोध्या राम मंदिर जमिनीत 2000 फूट खाली पुरली जाणार ‘टाइम कॅप्सूल’; 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन)

ANI ट्विट

दरम्यान, राम जन्मभूमी मंदिर उभारण्याआधी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते भूमिपुजन होणार आहे, यासाठी बद्रिनाथ येथून माती आणि अलकनंदा नदीचं पाणी अयोध्या येथे पाठवण्यात आले आहे विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) प्रतिनीधी सोमवारी (27 जुलै) अयोध्या येथे अलकनंदा नदीचे पाणी आणि बद्रिनाथ येथील माती घेऊन गेले आहेत.