पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोद्धा राम मंदिर भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार; देशभराती सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण
PM Narendra Modi | | (Photo Credits: File Photo)

भारतामध्ये अयोद्धा राम मंदिर प्रश्न निकाली लागल्यानंतर मंदिराच्या उभारणीच्या कामाला वेग आला होता. आता येत्या 5 ऑगस्ट दिवशी अयोद्धेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास आणि भूमीपुजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान या सोहळ्याला देशातील सार्‍या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण असेल अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिली आहे. या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवले जाईल. 200 पेक्षा अधिक लोक नसतील दरम्यान त्यामध्येही 150 हे आमंत्रित असतील अशी माहिती गिरी यांनी दिली आहे.

5 ऑगस्ट दिवशी राम मंदिराच्या भूमीपुजनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोद्धेमध्ये हनुमान गढीचं, त्यानंतर राम लल्लांचं दर्शन घेणार आहेत. ( नक्की वाचा: अयोद्धा राम मंदिर भूमीपूजन वरील शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपा नेत्या उमा भारती यांची टीका - 'PM मोदी नव्हे भगवान राम विरोधी वक्तव्य' असल्याचं मत ).

ANI Tweet

महाराष्ट्रात राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून अनेक चर्चा रंगत आहेत. एकीकडे शरद पवार यांनी कोरोना संकटकाळातही काही रामा मंदीर महत्त्वाचे वाटतं असं म्हणत भाजपाला टोला लगावला होता. तर एकेकाळी राम मंदिरासाठी आग्रही असलेली शिवसेना आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या पक्षांसोबत सत्तेत असताना राम मंदिरासाठी अयोद्धेला जाणार का? भाजपाकडून उद्धव ठाकरेंना आमंत्रण येणार का? असे प्रश्न विचारले जात होते. दरम्यान यावर अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर 100 दिवसांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह अयोद्धेला गेले होते. तेथे त्यांनी राम लल्लाचं दर्शन घेतलं होतं.