Ram Temple Foundation Stone Laying Ceremony: 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनासाठी बद्रीनाथ येथून माती आणि अलकनंदा नदीचे पाणी प्रतिनिधींद्वारे अयोध्येकडे रवाना
Water & soil sent to Ayodhya ahead of Ram Temple Stone laying foundation (Photo Credits: ANI)

अयोध्या (Ayodhya) येथे उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहेत. यासाठी बद्रिनाथ (Badrinath) येथून माती आणि अलकनंदा नदीचं (Alakananda River) पाणी अयोध्या येथे पाठवण्यात आले आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) प्रतिनीधी सोमवारी (27 जुलै) अयोध्या येथे अलकनंदा नदीचे पाणी आणि बद्रिनाथ येथील माती घेऊन गेले. (अयोध्या राम मंदिर जमिनीत 2000 फूट खाली पुरली जाणार ‘टाइम कॅप्सूल’; 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केवळ 200 लोक उपस्थित असतील. त्यापैकी 150 आमंत्रित पाहुणे असतील. तसंच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग पाळून हा कार्यक्रम पार पडेल.

ANI Tweet:

राम मंदिर उभारण्यापूर्वी जमिनीत 2000 फूट खाली एक टाईम कॅप्सूल पुरण्यात येणार आहे. भविष्यात पुढील पीढ्यांना राम मंदिर आणि त्याच्या इतिहास याविषयी माहिती देण्यासाठी ही कॅप्सुल उपयुक्त ठरेल. तसंच वर्तमानातील विविध घटना यामध्ये नमूद केल्या जातील, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य रामेश्वर चौपाल यांनी काल दिली होती. त्यानंतर आता भूमिपूजनाच्या कार्यक्रमापूर्वी त्या संदर्भातील पूर्वतयारीला वेग आला आहे.

अयोध्या राम जन्मभूमीचा प्रकरणाचा निकाल गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये लागला. त्यानंतर राम मंदिर बांधण्यासाठी जागा सोपवण्यात आली. तसंच त्यासाठी विश्वस्त स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.