Badrinath Dham Yatra, Death Image (PC - @chardham_yatra/Pixab)ay)

Badrinath Dham Yatra 2024: बद्रीनाथ धाम (Badrinath Dham) च्या दर्शनासाठी आलेल्या चार भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बद्रीनाथ धाममध्ये आतापर्यंत 46 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. सरिता परवाल (वय, 48 रा. सुभाष कॉलनी वॉर्ड क्रमांक 25 झालवाडा राजस्थान) या आपल्या नातेवाईकांसह बद्रीनाथ दर्शनासाठी आल्या होत्या. बद्रीनाथ धाम येथे त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र बद्रीनाथ येथे आणले. जिथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.

याशिवाय, डोम्पाका सुधाकर राव (वय, 68) रा. नरसन्नोपेटा श्रीकाकुलम आंध्र प्रदेश, सुबलाल (वय, 85) गाव परिसाखुर्द पो. बडोखरी मध्य प्रदेश, विदार्थ शर्मा (वय, 25 ) रा. एफ-66 दीनदयाल कॉलनी निवाई टोक राजस्थान यांचा मृतांमध्ये समावेश आहे. (हेही वाचा -Hajj 2024: मक्का येथे हज यात्रेदरम्यान 98 भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती)

नातेवाइकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र बद्रीनाथ येथे आणले. तेथे डॉक्टरांनी तिन्ही यात्रेकरूंना मृत घोषित केले. त्याचवेळी, आत्तापर्यंत केदारनाथमध्ये 27, यमुनोत्रीमध्ये 20 आणि गंगोत्री धाममध्ये आलेल्या सहा यात्रेकरूंचा आरोग्याच्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. (हेही वाचा -Hajj 2024: मक्का येथे उष्णतेमुळे 1 हजारहून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू; सौदी सरकारचा खुलासा)

चारधाम दर्शनासाठी वयोवृद्ध व तरुण तसेच लहान मुलांमध्येही मोठा उत्साह आहे. दरवर्षी चारधाम यात्रा भाविकांच्या संख्येत नवनवे विक्रम निर्माण करत आहे. एक काळ असा होता की, चारधाम यात्रेला फक्त वयोवृद्ध भाविक येत असत. मात्र आता वृद्धांव्यतिरिक्त बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धामच्या दर्शनासाठी तरुण आणि लहान मुलांमध्येही उत्साह आहे. कुटुंबासोबत लहान मुलेही दर्शनासाठी धामांवर पोहोचत आहेत. आतापर्यंत 66 हजारांहून अधिक मुलांनी चार धाम यात्रेला भेट दिली आहे.