Hajj 2024 (PC - Pixabay)

Hajj 2024: यंदा हज यात्रे (Hajj Yatra 2024) दरम्यान सौदी अरेबिया (Saudi Arabia) मध्ये 98 भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालायाने (Ministry of External Affairs) शुक्रवारी दिली. सर्व मृत्यू हे नैसर्गिक आजार, म्हातारपण यामुळे झाले आहेत. यामध्ये बेंगळुरूच्या दोन हज यात्रेकरूंचा समावेश आहे. कौसर रुखसाना (69) आणि अब्दुल अन्सारी (54) अशी त्यांची नावे आहेत.

दरवर्षी, अनेक भारतीय यात्रेकरू हजला जातात. या वर्षी, 1,75,000 भारतीय यात्रेकरूंनी हजसाठी आतापर्यंत सौदीला भेट दिली आहे. मुख्य हज कालावधी 9 ते 22 जुलैपर्यंत आहे. आतापर्यंत 98 भारतीय यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. या सर्वांच्या मृत्यूच कारणे नैसर्गिक आहेत. आजारपण आणि वृद्धत्व यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. (हेही वाचा -Hajj 2024: मक्का येथे उष्णतेमुळे 1 हजारहून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू; सौदी सरकारचा खुलासा)

हज यात्रा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे आणि सर्व मुस्लिमांनी त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी हे धार्मिक दायित्व पूर्ण केले पाहिजे, असं म्हटलं जातं. यंदाच्या यात्रेदरम्यान उष्णतेची लाट असून तापमान 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, जे अलिकडच्या दशकांतील उच्चांक आहे. (हेही वाचा -Hajj 2024: हज यात्रेदरम्यान उष्णतेमुळे 550 यात्रेकरुंचा मक्का येथे मृत्यू; इजिप्शियन आणि जॉर्डन नागरिकांचाही मृतांमध्ये समावेश)

सौदीच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की तीर्थक्षेत्रातील तापमान दर दशकात 0.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. 2023 मध्ये, हज दरम्यान 200 हून अधिक यात्रेकरू मरण पावले आणि तापमान 48 अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यामुळे 2,000 हून अधिक लोकांना उष्णतेशी संबंधित तणावाचा सामना करावा लागला.