अयोध्या राम मंदिर जमिनीत 2000 फूट खाली पुरली जाणार ‘टाइम कॅप्सूल’; 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन
Ayodhya Shri Ram Janmabhoomi Mandir (Photo Credits: Facebook)

अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir)  भूमी पूजनासाठी 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते हे भूमिपुजन होणार आहे, या मंदिराशी संबंधित एक महत्वाची अपडेट आता हाती येत आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य रामेश्वर चौपाल यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर ज्या जमिनीवर उभारले जाणार आहे त्याच्या 2000 फूट खाली जमिनीत एक टाइम कॅप्सूल (Time Capsule) पुरून ठेवली जाणार आहे. ही टाइम कॅप्सूल म्हणजे आताच्या सर्व घडामोडीची माहिती असेल, भविष्यातील पिढ्यांना मंदिर आणि त्याच्या इतिहासाविषयी माहिती देण्यासाठी ही कॅप्सूल उपयोगी ठरेल तसेच वर्तमानातील विविध घटनांविषयी यामध्ये नमूद केले जाणार आहे ही माहिती पुढील काळात आताच्या मानवी इतिहासाचा पुरावा असेल . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोद्धा राम मंदिर भूमिपूजन 5 ऑगस्टला होणार; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण.

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य रामेश्वर चौपाल यांनी म्हटले आहे की, राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करताना जमिनीपासून 2 हजार फूट खाली एक ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार आहे. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास त्याला यामुळे रामजन्मभूमी बद्दलची केवळ तथ्यं सापडतील.

ANI ट्विट

दरम्यान, मंदिराच्या विषयी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची 161  फूट इतकी असणार आहे, मंदिराच्या भिंती 6 फुटांच्या दगडांनी बांधल्या जातील. मंदिराला एकूण पाच कळस व पाच प्रवेशद्वार असणार आहेत. मंदिराचा दरवाजा संगमरवर दगडाचा असेल. भूमीपूजनासाठी गंगा, यमुना आणि सरस्वतीचा त्रिवेणी संगम असलेल्या ठिकाणाची माती अयोध्येत आणली जाणार आहे.