अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Photo Credits-ANI)

देशभरातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. मोदी यांनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनचे आदेश देताना आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली होती. त्यावेळी कोरोनाच्या परिस्थितीत देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. याच पार्श्वभुमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या मोदी यांच्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजबाबत माहिती देत आहेत.

मागील 3 टप्पांमध्ये MSME सेक्टर, पगारदार वर्ग, शेतकरी, श्रमिक, स्थलांतरीत मजूर यांच्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर कोळसा व्यवसाय, खनिजे व्यवसाय, संरक्षण संसाधनांची निर्मिती, एअरस्पेस मॅनेजमेंट, MRO, अवकाश संशोधन क्षेत्र आणि अणू ऊर्जा या क्षेत्रांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. तर आता निर्मला सीतारमण यांनी गरिब, गरजू आणि जनधन योजनेसह उज्वला योजनेअंतर्गत नागरिकांना कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत ते स्पष्ट केले आहे. (आयुध निर्मिती बोर्डचे Corporatization ते संरक्षण संसाधन निर्मिती मधील FDI पर्यंत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांंनी जाहीर केले 'हे' निर्णय)

-गरिबापर्यंत, गरजूंना तातडीने आर्थिक मदत पोहचवली जात आहे

-तंत्रज्ञानामुळे गरिबांच्या शिखात तत्काळ पैसे पोहचवले जातायत

-देशभरात उज्ज्वला योजनेअंतर्गत 6.81 कोटी सिलिंडरचे वाटप

-जनधन योजनेअंतर्गत 20 हजार 225 कोटी खात्यात जमा

-16 हजार 394 कोटी थेट गरजूंच्या खात्यात जमा

-घरी परतणाऱ्या मजूरांसाठी स्पेशल ट्रेनची सोय करण्यात आली आहे. त्यानुसार स्थलांतरित कामारांचा आतापर्यंत 85 टक्के खर्च केंद्राने उचलला आहे.

-देशातील 80 कोटी जनतेला मोफत गहू, तांदूळ, डाळ देण्यात आली

सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. निर्मला सीतारमण यांनी 15000 कोटी रुपयांबाबत घोषणा करत असे म्हटले आहे की, राज्य, अत्यावश्क वस्तू आणि टेस्टिंग किट्स-लॅबसह टेलिकॉन्सिलुशन सर्विस, आरोग्य सेतु अॅप आणि आरोग्य खात्यामधील कामगारांसाठी याचा वापर करण्यात येणार आहे.