Assembly Election Results 2021 Aaj Tak Live Streaming: पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, असम, पुडुचेरी विधानसभा निवडणूक निकाल Aaj Tak  लाईव्ह स्ट्रिमिंग इथे पाहा
Assembly Election 2021 Exit Poll Result | (File Image)

पश्चिम बंगाल (West Bengal), केरळ (Kerala), तामिळनाडू (Tamil Nadu), असम (Assam) आणि पुद्दुचेरी (Puducherry) या पाच राज्यांसाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2021 (Assembly Election Results 2021) च्या मतदानाची मतमोजणी (Assembly Elections 2021 Results) आज (2 मे 2021) पार पडत आहे. या पाच राज्यांपैकीअसम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी राज्यांत एकाच टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यात मतदान पार पडले. करोना व्हायरस संकट कायम असताना या निवडणुका पार पड्ल्या आहेत. निवडणउका पार पडत असलेल्या राज्यांतील सर्व मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या निवडणूक प्रचारात विशेष हजेरी लावली होती. त्यामुळे या निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. निवडणुकांचे निकाल काय येतील याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणूक निकालांचे आज तक या खासगी वृत्तवाहिणीवर लाईव्ह स्ट्रिमिंग (Aaj Tak Live Streaming) आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन पाहू शकता.

पश्चिम बंगाल (West Bengal), केरळ (Kerala), तामिळनाडू (Tamil Nadu), असम (Assam) आणि पुद्दुचेरी (Puducherry) या पाच राज्यांसाठी एकूण 822 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली. आज सकाळी 8 वाजलेपासून या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु होत आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्व आणि आचार संहितेचे पालून करुन ही मतमोजणी पार पडणार आहे. प्राप्त माहितीनुसार पाच राज्यांमध्ये सुमारे 2,364 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. यात बंगाल राज्यात1113, केरळ 633, असम 331, तमिलनाडु 256 आणि पुडुचेरी राज्यात 31 मतमोजणी केंद्रं उभारण्यात आली आहेत. (हेही वाचा, Assembly Election Results 2021 ABP News Live Streaming: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, असम, पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक निकालाचे इथे पहा लाईव अपडेट्स)

आज तक लाईव्ह स्ट्रिमिंग

सांगितले जात आहे की, कोरोना महामारी निर्बंधांनुसार कोणताीह उमेदवार किंवा त्यांचा एजंट यांना कोरोना व्हायरस चाचणी कारावी लागणार आहे. कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याशिवाय कोणताही उमेदवार अथवा त्यांच्या एजंटला मतदान केंद्रांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना नियमांचे काटेकोर पालण करण्यासाठी कोणताही अनुचीत प्रकार टाळणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.