पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, असम, पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक निकाल आज जाहीर होणार आहेत. त्याकडे सार्या देशाचे लक्ष लागले आहे. 2 दिवसांपूर्वीच या निवडणूकांचे एक्झिट पोल हाती आले आहेत. दरम्यान आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यानंतर हळूहळू निकाल स्पष्ट होतील. यंदा देशात कोरोना वायरसचं संकट धुमाकूळ घालत असल्याने मत मोजणी नंतर विजयी मिरवणूकांवर बंदी घालण्यात आली आहे. तर मत मोजणी केंद्रांवर देखील आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असल्यासच काही मोजक्या प्रतिनिधींना परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान आज 5 राज्यांमध्ये लागणारे निवडणूक निकाल तुम्हांंला एबीपी माझासह एबीपी न्यूज वर देखील पाहता येणार आहे. पश्चिम बंगाल मध्ये ममता दीदी विरूद्ध भाजपा असा संघर्ष रंगणार आहे. आणि यावेळेसही दीदी गड राखणार का? हा मोठा प्रश्न आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजपाकडून अमित शाह, नरेंद्र मोदी, जेपी नड्डा प्रचारात उतरले होते.
एबीपी न्यूज लाईव्ह स्ट्रिमिंग
पश्चिम बंगाल मध्ये 294, तमिळनाडू मध्ये 234, असम 126, पुदुचेरी 30 आणि केरळ मध्य 140 जागांसाठी झालेल्या निवडणूकीचा आज निकाल स्पष्ट होईल.