Arrested

Assam: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर भारतात तालिबानी दहशतवादी आणि त्यांची विचारसरणींचे समर्थन करणारी काही प्रकरणे समोर येत आहेत. याच पार्श्वभुमीवर आसाम येथून तालिबानी विचारसरणीसह त्यांच्या दहशतवादाला समर्थन करणारी पोस्ट शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आसाम मध्ये अटक करण्यात आलेल्या 14 लोकांनी सोशल मीडियात अफगाणिस्तानातील तालिबान यांचा ताबा हा योग्य असल्याचे म्हणत आपत्तीजनक कंटेट सुद्धा पोस्ट केला होता.

या प्रकरणी आसाम पोलीस दलातील स्पेशल डीजीपी जीपी सिंह यांनी शनिवारी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी 14 जणांना अटक केल्यासंबंधित माहिती दिली आहे. तसेच तालिबान्यांच्या गतविधीसंबंधित पोस्ट केल्याने ही अटक केल्याचे ही स्पष्ट केले आहे. ज्यावर राज्याचे सुद्धा काही कायदे लागू केले जातात. त्यामुळे लोकांना सल्ला दिला गेला आहे की, त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करताना सावधगिरी बाळगावी. जेणेकरुन ते दंडाचे भागीदार होण्यापासून बचावतील.(Afghanistan-Taliban Conflict: तालिबानांच्या प्रवेशानंतर अफगाणिस्थानातील महिला भयभीत, रस्त्यावर एकही महिला दिसली नाही)

Tweet:

दरम्यान, पोलिसांनी ट्विटमध्ये अटक करण्यात आलेल्यांची नावे सुद्धा जाहीर केली आहेत. आसाम पोलिसांच्या मते, तालिबानी विचारसरणी असलेल्यांच्या विरोधात कारवाई करत UAPA ,IT अॅक्ट आणि सीआरपीसीच्या विविध कलमाअंतर्गत अॅक्शन घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आसाम मधील कामरुप, धुबरी आणि बारपेटा मधील दोन-दोन लोकांना अटक केली आहे. तर दाररंग, कछार, दक्षिण सालमारा, होजाई आणि गोपरा जिल्ह्यातून एक-एका व्यक्तीला अटक केली आहे. या सर्वांनी तालिबान्यांचे समर्थन केले आहे.