Adult female rhino was killed (Photo Credits-ANI)

असम (Assam) येथे गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध जिह्यात पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले होते. त्याचसोबत जनावरांना सुद्धा या पुराच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी 100 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु याच दरम्यान आता एका गेंड्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या गेंड्याला बंदुकीची गोळी घालून ठार माल्याचा संशय वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (असम: मुसळधार पावसामुळे ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गुवाहाटी येथील गावात पुर परिस्थिती)

फिमेल गेंड्याचा मृतदेह हा गॅब्रई विरोधी शिकार शिबिर येथे आढळून आला आहे. या अडल्ट फिमेल गेंड्याला गोळी घालून मारण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गेंड्याचा सुळा घेऊन शिकाऱ्याने पळ काढला. परंतु या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील विनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.(Assam Floods: असम मधील पुरामुळे 56,64,499 जणांना फटका तर 93 जणांचा मृत्यू, सरकारची माहिती)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी असम मध्ये आलेल्या पुरात  8 गेंडे, 3 वन्य म्हशी, 7 रानडुक्कर, 3 सारंग हरिण, 74 सांबर आणि 2 सुंदरींचा मृत्यू झाला होता. तर केरळ ते हिमाचल प्रदेश आणि गुजरात ते असम येथे पावसाचा जोर वाढलेला दिसून आला होता. त्यामुळे अनेकांचे नुकसान सुद्धा झाले आहे. जंगलझाड्यांमध्ये याच पावसामुळे हत्ती सुद्धा वाहून गेले आहेत. त्याचसोबत केरळ येथे काल एका बेबी हत्तीचा सुद्धा मृतदेह आढळून