देशभरात पावसाने चांगलाच जोर धरल्याने विविध राज्यातील सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले आहे. तर काही ठिकाणी या साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याच दरम्यान दरवर्षी असम येथे पावसाळ्याच्या काळात पुराची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते. तर आता सुद्धा असम येथे मुसळधार पाऊस सुरु असून ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. परिणामी नदीचे पाणी गुवाहाटी येथे असलेल्या गावात शिरल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.(बंगळुरु: कोरोना व्हायरसमुळे मुर्तिकारांना जबरदस्त फटका, सरकारने मदत करण्याची विनंती)
असम येथे पुराची परिस्थिती निर्माण झाल्याने आणखी 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी समोर आली होती. राज्यातील 33 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांमध्ये पूर-संकट निर्माण झाले आहे. नद्यांची पातळी वाढल्याने राज्यातील मोठ्या लोकसंख्येवर त्याचा परिणाम झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे की, 14 जुलै पर्यंत आतापर्यंत पूरामुळे 59 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जिल्ह्यातील 45,40,890 लोकांना याचा फटका बसला आहे.
Assam: Villages near Guwahati have been flooded as water level in Brahmaputra river has risen following heavy rainfall in the region. pic.twitter.com/zCCyx2GzJ0
— ANI (@ANI) July 16, 2020
पुरामुळे राज्यातील 28 जिल्ह्यांमधील 128.495 हेक्टर जमीन पाण्यात बुडून गेली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना आपत्तीपासून वाचवण्यासाठी 24 जिल्ह्यांमध्ये 517 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे सुरू केली आहेत. या ठिकाणी 44,000 लोकांना ठेवण्यात आले आहे. या पुरामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा 80 टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. पुरामुळे आतापर्यंत 66 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर 170 प्राण्यांचा बचाव करण्यात आला आहे.