देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने याचा सर्वच उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. सध्या काही उद्योगधंदे जरी सुरु झाले असले तरीही यापूर्वी सारखी कमाई त्यांची होत नसल्याचे बहुतांश ठिकाणी दिसून येत आहेत. याच दरम्यान आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav) लगभग सुद्धा दिसून येत नाही आहे. यंदाचा गणेशोत्सवाचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु याचा सर्वाधिक फटका मुर्तिकारांना बसला आहे. त्यांच्याकडे मुर्ति बनण्यासाठी अद्याप ऑर्डरच आली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बंगळुरु येथील मुर्तिकाराने असे म्हटले आहे की, कोविड19 मुळे कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक वर्षाला हजारो मुर्तिकारांना मुर्ति साकारण्याचे काम मिळते. परंतु यंदाच्या वर्षात 50 टक्के काम कमी झाले आहे. अद्याप नागरिकांकडून मुर्ति बनवण्यासंदर्भात ऑर्डर सुद्धा आलेली नाही. आमचे मोठे नुकसान होत असल्याने आता सरकारने आम्हाला मदत करावी अशी विनंती मुर्तिकाराने केली आहे.(मुंबईतील सर्वात श्रीमंत अशा GBS मंडळाची गणेशोत्सवासाठी मुर्ती 14 फुट सकारण्यासाठी राज्य सरकारने परवानगी देण्याची मागणी)
Bengaluru:Idol makers facing hardships amid #COVID19 outbreak. An artist says,"Every year,over 1000 workers get engaged in making Ganesh idols. This yr, production has reduced by 50%&we've received no order as of now.We request govt to help us as pandemic has caused us huge loss” pic.twitter.com/VgYdvbOfAJ
— ANI (@ANI) July 12, 2020
दरम्यान, यंदाचा गणेशोत्सव ऑगस्ट महिन्यात साजरा करण्यात येणार आहे. परंतु देशातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तो साधेपणाने करण्याचा निर्णय विविध गणेशमंडळांनी घेतला आहे. खासकरुन महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मोठी धुम पाहता येते. परंतु ही धुम यंदा गणेशभक्तांना पहायला मिळणार नाही आहे. तसेच गणेश मंडळांना सरकारने नियमावली नुसार सण साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.