हैदराबाद लोकसभेचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी संपूर्ण भारतात झेड प्लस सुरक्षितता दिली जाणार आहे. या संदर्भात निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने असे म्हटले की, सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षितता त्यांना दिली जाणार आहे. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी ते निवडणूकीचा प्रचार करुन दिल्लीत जाण्यासाठी निघाले होते. असदुद्दीन ओवैसी यांच्यावर हा हल्ला उत्तर प्रदेशातील निवडणूकीपूर्वी झाल्याने आता यावरुन राजकरण सुरु झाले आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी असा आरोप लावला आहे की, निडणूक राज्य उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातून दिल्लीकडे जाताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. त्यांनी म्हटले की, मी सुरक्षित आहे. या संदर्भात ओवैसी यांनी ट्विट सुद्धा केले. त्यात त्यांनी असे म्हटले की, गाडीवर गोळीवर केला गेला. यामध्ये 3-4 जण होते पण हत्यारे तेथेच टाकली आणि ते पसार झाले.(Asaduddin Owaisi Vehicle Attacked: निवडणूक प्रचार करुन परतणाऱ्या AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार)
Tweet:
कुछ देर पहले छिजारसी टोल गेट पर मेरी गाड़ी पर गोलियाँ चलाई गयी। 4 राउंड फ़ायर हुए। 3-4 लोग थे, सब के सब भाग गए और हथियार वहीं छोड़ गए। मेरी गाड़ी पंक्चर हो गयी, लेकिन मैं दूसरी गाड़ी में बैठ कर वहाँ से निकल गया। हम सब महफ़ूज़ हैं। अलहमदु’लिलाह। pic.twitter.com/Q55qJbYRih
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 3, 2022
या प्रकरणी उत्तर प्रदेशातील पोलिसांकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आरोपींनी ओवैसी यांच्यावर का हल्ला याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून करण्यात येणाऱ्या विधानांनुळे संतप्त असल्याने त्यांच्या कारवर गोळ्या झाडण्यात आल्या.