Arun Jaitley Health Update: अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत AIIMS कडून Medical Bulletin जारी; पाहा काय म्हणाले डॉक्टर
Arun Jaitley (Photo Credits: PTI)

Aiims Released Medical Bulletin Of Arun Jaitley: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते (Senior BJP Leader ) अरुण जेटली (Arun Jaitley ) यांची प्रक्रृती स्थिर आहे. अरुण जेटली यांच्या प्रकृतीची महिती देण्यासाठी एम्स (Aiims ) रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन  (Medical Bulletin) प्रसिद्ध केले. यात जेटली यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जेटली यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. जेटली यांच्या रक्ताचा नमुना आणि यूरिन प्रोफाईल रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरंनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.

एम्सचे वरिष्ठ डॉक्टर आणि हृदयरोग तज्ज्ञ व्ही के बहल यांच्यासह नेफ्रोलॉजी, एंडोक्रॉइनोलॉजी यांच्यासह पाच विभागांच्या वरिष्ठ डॉक्टरांचे एक पथक जेटली यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन आहे. सांगितले जात आह की, जेटली यांना छातीत दुखण्याच्या त्रासासोबतच श्वसनासही त्रास होत आहे.

एम्सचे फुफ्फुस तज्ज्ञ विभागातील डॉक्टरांना त्यांच्या फुफ्फुसात पाणी  आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. जेटली यांना प्रतिजैवकांच्या औषधांची मात्रा देण्यात येत असल्याचे वृत्तही काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

एम्स ट्विट

एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता आलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार त्यांची प्रकृती स्थिर असून, नियंत्रणात आहे. काही महिन्यांपूर्वीच जेटली यांच्यावर किडणी प्रत्यारोपण करण्यात आले होते. अशा प्रकारचे प्रत्यारोपण झाल्यानंतर नियमीत तपासणीची आवश्यकता असते. त्यामुळे अनेक रुग्ण अशा तपासणीसाठी येत असतात. (हेही वाचा, भाजप नेते-माजी केंद्रीय अर्थमंत्री Arun Jaitley दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात दाखल)

दरम्यान, अरुण जेटली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एडीए 1 सरकारमध्ये केंद्रात अर्थमंत्री होते. मात्र, गेले काही काळ ते सतत आजारी असल्याने त्यांनी स्वत:हूनच पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीले होते. या पत्रात त्यांनी आपण प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव मंत्रीमंडळात सहभागी होत नसल्याचे म्हटले होते.

पंतप्रधान मोदी यांना लिहीलेले पत्र जेटली यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केले होते. या पत्रात 'गेले 18 महीने प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त आहे. माजी प्रकृती सध्या ठिक नाही. त्यामुळे माझा मंत्रिमंडळात समावेश न करण्याबाबत विचार करण्यात यावा', असे जेटली यांनी म्हटले होते. दरम्यान, या पत्रानंतर 30 मे रोजी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने शपथग्रहण केली होती.