भाजप नेते-माजी केंद्रीय अर्थमंत्री Arun Jaitley  दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात दाखल
Arun Jaitley (Photo Credits: IANS)

ज्येष्ठ भाजप नेते (Senior BJP Leader ) आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री (Former Union Finance Minister ) अरुण जेटली (Arun Jaitley) यांना दिल्ली येथील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आहे. शुक्रवारी (9 ऑगस्ट 2019) सकाळी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात सकाळी 11 वाजता दाखल करण्यात आले.  अरुण जेटली हे गेले प्रदीर्घ काळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्रातील एडीएप्रणीत भाजप सरकारच्या दुसऱ्या सत्ताकाळात सहभागी होण्यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे.

अरुण जेटली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एडीए 1 सरकारमध्ये केंद्रात अर्थमंत्री होते. मात्र, गेले काही काळ ते सतत आजारी असल्याने त्यांनी स्वत:हूनच पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीले होते. या पत्रात त्यांनी आपण प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव मंत्रीमंडळात सहभागी होत नसल्याचे म्हटले होते.

पंतप्रधान मोदी यांना लिहीलेले पत्र जेटली यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केले होते.  या पत्रात 'गेले 18 महीने प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त आहे. माजी प्रकृती सध्या ठिक नाही. त्यामुळे माझा मंत्रिमंडळात समावेश न करण्याबाबत विचार करण्यात यावा', असे जेटली यांनी म्हटले होते. दरम्यान, या पत्रानंतर 30 मे रोजी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने शपथग्रहण केली होती.