Anna Hazare Wrote to Narendra Singh Tomar: शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास अन्नत्याग करण्यासंदर्भात अण्णा हजारे यांचे नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र
अण्णा हजारे (Photo Credits: IANS)

Anna Hazare Wrote to Narendra Singh Tomar: केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या (Farm Law) विरोधात देशभरातून तीव्र आंदोलन गेल्या काही दिवसांपासून केले जात आहे. तर दिल्लीतील सिंघु बॉर्डवर (Singhu Border) हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलन आपले सुरुच ठेवले आहे. याच पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. तर 80 वर्षीय असलेल्या अण्णांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केंद्र सरकारला चेतावणी दिली आहे. या संदर्भातील एक पत्र सुद्धा कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पाठवण्यात आले आहेत. त्यामध्ये अण्णा यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल उल्लेख केला आहे.(Farmers Protest Update: नवी दिल्लीत शेतक-यांचे आंदोलन आणखीनच तीव्र, अन्नदात्यांचे आज उपोषण)

अण्णा हजारे यांनी पत्रात असे म्हटले आहे की, राळेगण सिद्धीत श्री राधा मोहन सिंग, देवेंद्र फडणवीस, डॉ. सुभाष भामरे आणि गिरीश महाजन यांच्यासोबत 5 फेब्रुवारी 2019 मध्ये पार पडलेल्या बैठकीत उपस्थितीत करण्यात आलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकारकडून कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले गेले होते. तर केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला निवडणूक आयोगासारखा संविधानिक दर्जा देऊन संपुर्ण स्वायत्तता देणे असे म्हटले आहे.

तसेच स्वामीनाथन आयोगाच्या सिफारशीनुसार, शेतीच्या उत्पादनाचे मुल्य C2+50 निर्धारित करावे, फळ, भाज्या आणि दूधासाठी MSP लागू करावी. शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्त करण्यासाठी उपययोजना, आयात-निर्यात संदर्भात निर्णय, आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीची शेतीची अवजारे आणि पाणी वाचवण्यासाठी ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकल इरिगेशन सारख्या सुविधांवर 80 टक्के अनुदान लागू करावे असे ही त्या पत्रात म्हटले होते.(Farmers Protest: शेतकरी आंदोलनासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य)

Tweet:

त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलकांनी आज एक दिवस उपवास ठेवला होता. याच कारणास्तव अण्णा हजारे यांनी सु्द्धा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अन्नत्याग करु असा इशारा केंद्र सरकारला दिला आहे. तर 2019 मध्ये थांबलेला अन्नत्यागाचे आंदोलन पुन्हा एकदा सुरु करण्याचा विचार सुरु झाला आहे. त्यामुळे लवकरच आंदोलन कुठे करणार, कधी करणार आणि कोणत्या वेळी करणार हे ठरल्यानंतरच जाहीर केले जाऊ शकते.

शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी दोन दिवस आधी अ्णा हजारे यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकपाल आंदोलनच्या वेळी जसे खडबडून जागे केले होते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडून हे आंदोलन केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या भारत बंदच्या दिवशी राळेगणसिद्धीत लाक्षणिक उपवास केला होता. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात माझा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे ही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.