Farmers Hunger Strike (Photo Credits: ANI/Twitter)

नव्या कृषी विरोधक कायद्याविरोधात (New Farm Bill) नवी दिल्लीत शेतकरी संघटना गेल्या 18 दिवसांपासून आदोलनाला (Farmers Protest) बसले आहेत. या आंदोलनात अनेक शेतक-यांचा समावेश आहे. केंद्र सरकार (Central Government) शेतकरी संघटनांच्या मागण्यांना घेऊन गंभीर नसल्याने आता हे आंदोलन उग्र रुप धारण करु लागले आहे. त्याचाच एक भाग आज या शेतकरी संघटना उपोषणास (Huger Strike) बसले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे उपोषण असणार आहे. या दरम्यान हे अन्नदाते अन्नत्याग करणार आहेत.

दरम्यान आजपासून हे आंदोलन आणखीन तीव्र होईल असे शेतकरी नेते गुरनाम लिंब चढूनी म्हणाले. तसेच आज जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयांसमोर, भाजपा नेत्यांच्या घरांसमोर तसेच रिलायंस, अदानी टोल प्लाझावर शेतकरी आंदोलन करणार आहेत. सध्या ट्रेन रोखली जाणार नाही. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सीमाभागात बॅरिकेटिंग वाढवण्यात आली आहे. सोबतच ड्रोनच्या मदतीने देखील आंदोलनावर लक्ष ठेवले जाणार आहे. दरम्यान कायदे मोडणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल असा पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे.हेदेखील वाचा- Farmers Protest: शेतकरी आंदोलनासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

यासोबत या आंदोलनाला पाठिंबा देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील एक दिवसाचा उपवास धरला आहे. त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व समर्थकांना एक दिवसाचा उपवास करण्याचं आवाहन केलं आहे. शेतकरी गेले संघटना गेले 18 दिवसांत कडाक्याच्या थंडीत नवी दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत. त्यामुळे आपल्या अन्नदात्याचे हे आंदोलन पाहून विरोधी पक्षनेते, सेलिब्रिटी तसेच अनेक खेळाडूंनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.