महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे आज पासून मौनव्रत
Anna Hazare | (Photo credits: file photo)

देशभरात सुरु असणाऱ्या महिला अत्याचार घटनांच्या विरुद्ध समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आजपासून नवे आंदोलन पुकारले आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीवरील सुनावणी व शिक्षा करण्याची प्रक्रिया जलद व्हावी, ही मागणी घेऊन अण्णा हजारे आज, 20 डिसेंबर (शुक्रवार) पासून राळेगणसिद्धी (Ralegansiddhi) येथे मौनव्रत धारण करणार आहेत. हे आंदोलन पुकारण्याआधी अण्णा यांनी 10 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना, तर 13 डिसेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath यांना पत्रातून याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. (दिल्ली येथील निर्भया बलात्कार प्रकरणी अण्णा हजारे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र)

मागील काही काळात हैद्राबाद, उन्नाव येथील अत्याचार व बलात्कार घटनांनी देशात खळबळ माजली आहे. दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन सात वर्षे उलटली तरी अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही, देशात फास्टट्रॅक कोर्टात लाखो प्रकरणे पडून आहेत, न्याय आणि शिक्षेला उशीर होत असल्यानेच हैदराबाद एन्काऊंटरचा जनतेने आनंद साजरा केला आहे.या दिरंगाईमुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडत चालला आहे. हे रोखण्यासाठी सरकारने जलद कारवाई करावी अशी मागणी अण्णा हजारे यांनी सादर केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

अण्णा हजारे पोस्ट

बलात्कार आणि हत्या प्रकरणात 2014 ला शेवटची फाशी झाली आहे. त्यानंतर 426 प्रकरणात फाशीची शिक्षा होऊनही त्यांची अद्याप अंमलबजावणी नाही यामुळेच न्यायव्यवस्थेच्या जलद कामावर लोकांना संशय आहे अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याशिवाय, महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर हेल्पलाईन निर्माण करून त्यांची कार्यतत्परता वाढवावी, सर्वोच्च न्यायालयाने पोलिस दलात सुधारणा करावी, याप्रकरणात सुनावणी करण्यासाठी न्यायालयात न्यायाधीशांची रिक्त पदे तत्काळभरण्यात यावीत, . महिला अत्याचारासंदर्भात तक्रार घेताना प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी, असा अनेक मागण्या घेयून अण्णा हजारे आजपासून आपले मौनव्रत आरंभणार आहेत.