दिल्ली येथील निर्भया बलात्कार प्रकरणी अण्णा हजारे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
Anna Hazare (Photo Credits: ANI)

हैदराबाद बलात्कार आणि हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा एन्काउंटर केला आहे. त्यानंतर उन्नाव बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. यातच समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) आक्रमक झाले असून त्यांनी निर्भया बलात्कार (Nirbhaya Rape Case) प्रकरणावर सर्वांचे लक्ष केंद्रीत केले आहे. दिल्लीच्या निर्भायाला न्याय मिळण्यासाठी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहले आहे. तसेच लवकरच निर्भयाला न्याय मिळावा यासाठी अण्णा हजारे 20 डिसेंबरपासून मौनवत करणार असल्याची माहिती टीव्ही9 वृत्तवाहिनीने दिली.

हैदराबाद, उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरण पेटलेले असताना बलात्काराच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर झालेल्या अत्याचारावर दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या घटनेतील पीडितेला लवकरच न्याय मिळवा, यासाठी अण्णा हजारे यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. अण्णा हजारे यांनी हे पत्र निर्भया बलात्कार प्रकरणातील पीडिताला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी लिहले आहे. त्याचबरोबर येत्या 20 डिसेंबरपासून मौनवत करणार असल्याचेही माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर; जाणून घ्या काय आहे या अनुपस्थितीचं कारण

हैदराबाद बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा एन्काउंटर केला होता. यामुळे देशभरातून हैदराबाद येथील पोलिसांचे कौतुकही करण्यात आले होते. तसेच यानंतर बलात्कार करणाऱ्या आरोपींना एन्काउंटर हीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या संख्येत भर पडली आहे.