Black Fungus वरील उपचारासाठी IIT Hyderabad ने बनवली Amphotericin B ओरल टॅबलेट
Black fungus (Photo Credits-Facebook)

कोविड-19 (Covid-19) नंतर होणाऱ्या ब्लॅक फंगस (Black Fungus) इंफेक्शनच्या उपचारासाठी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैद्राबाद (IIT Hyderabad) यांनी एक टॅबलेट बनवली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनसुार, ही टॅबलेट नॅनो फायबर बेस्ड Amphotericin B (AmB) ओलर टॅबलेट (Oral Tablet) असून पोस्ट कोविड फंगल इंफेक्शनसाठी उपयुक्त ठरेल. या औषधाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी फॉर्मासिटीकल पार्टनरचा रिसर्चर शोध घेत आहेत. सध्या वापरत असलेले AmB हे इंजेक्शन ड्रग आहे.

2019 मध्ये केमिकल  इंजिनियरींग डिपार्टमेंटचे सप्तर्षी मजुमदार आणि चंद्रशेखर शर्मा यांनी ओरल नॅनोफायब्रोस AmB वर अभ्यास केला होता. काला आजार नामक रोगावरती उपचार करण्यासाठी याचा वापर केला जात होता. या आजारामध्ये ताप, वजन कमी होणे, लीव्हरला सुज येणे अशी लक्षणे आढळून येत होती. नॅनोफायब्रोसला ओरल टॅबलेटमध्ये रुपांतर करण्याचा हा पहिला प्रयत्न होता. (Fact Check: कांद्यावरील काळ्या डागांमुळे पसरतो Black Fungus? फेसबुक वर करण्यात आलेल्या दाव्यामागील जाणून घ्या सत्यता)

दोन वर्षांच्या अभ्यासामुळे रिसर्चंना विश्वास आहे की ही टेक्नॉलॉजी आणि योग्य फॉर्मा पार्टनरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर याचे उत्पादन करण्यात येईल. सध्या ब्लॅक फंगस आणि इतर फंगल इंफेक्शनसाठी या औषधाचा वापर केला जात आहे. सध्या देशातील ब्लॅक फंगसची परिस्थिती पाहता लवकरात लवकर याचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन करणे आणि संपूर्ण देशभरात वितरण करणे गरजेचे आहे.

ब्लॅक फंगस पीडितांसाठी योग्य औषध शोधून काढणे हे आमच्या रिसर्चचे मुख्य उद्दीष्ट आहे. हे औषध बनवण्यासाठी वापरली जाणारी टेक्नॉलॉजी आयपी फ्री असल्यामुळे याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे सहज शक्य आहे. त्यासोबतच हे औषध कमी दरामध्ये लोकांसाठी उपलब्ध देखील करता येईल. फॉर्मा कंपन्यांनी आमच्या पब्लिक आणि कॉर्पोरेट रिलेशन्स सोबत संपर्क साधावा, असे शर्मा यांनी म्हटले आहे.