Ambani Vs Adani : देशातील दोन बडे उद्योगपती आमने सामने येणार, आता टेलिकॉम इंडस्ट्रीत अंबानी विरुध्द अदानी?
Gautam Adani & Mukesh Ambani (Photo Credit - PTI)

गेल्या काही वर्षांत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याचा देशात मोठा विस्तार झाला आहे. पण या कालावधीत कधीही अंबानी विरुध्द अदाणी ही स्पर्धा बघायला मिळाली नाही. किंवा किंबहूना ती स्पर्धा करण्याचं दोघांनी टाळलं असं बोल्या जात. पण आता पहिल्यांदाचं 5G दूरसंचार सेवांसाठी स्पेक्ट्रम (Spectrum) लिलावादरम्यान (Auction) हे दोनही उद्योगपती एकमेकांच्या आमनेसामने येणार आहेत.  दोन गुजराती (Gujrati) उद्योगपती एकमेकांचे स्पर्धक असतांनाही त्यांना समोरासमोर बघण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

 

दूरसंचार स्पेक्ट्रम मिळविण्याच्या शर्यतीत अदानी ग्रुप सहभागी होत असला तरी ते विमानतळांपासून ते व्यवसायांना समर्थन देण्यासाठी खाजगी नेटवर्क म्हणून टेलिकॉम स्पेक्ट्रमचा वापर करणार असल्याची भुमिका अदानी ग्रुपने मांडली आहे.  अदानी ग्रुप आता 5G स्पेक्ट्रम लिलावात सायबर (Cyber) सुरक्षा,विमानतळ, बंदरे,लॉजिस्टिक, वीज निर्मिती, प्रसारण, वितरण आणि विविध उत्पादन ऑपरेशन्समध्ये (Operations) खाजगी नेटवर्क सोल्यूशन्स (Private Network Solution) प्रदान करण्यासाठी सहभागी होणार असल्याची माहिती अदानी ग्रुपकडून देण्यात आली आहे. म्हणजेच अदानी ग्रुप ग्राहकांच्या मोबाइल टेलिफोनी क्षेत्रात प्रवेश करणार नाही. पण ग्राहकांच्या मोबाइल टेलिफोनी क्षेत्रात अंबानींच्या रिलायन्स जिओचा सर्वात मोठा सहभाग आहे.  पण दूरसंचार कंपन्यांनी खाजगी कॅप्टिव्ह नेटवर्क्ससाठी दूरसंचार संस्थांना स्पेक्ट्रमचे थेट वाटप करण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. यामुळे दुरसंचार व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो. पण आता सरकारने मात्र खासगी नेटवर्कच्या बाजूने निर्णय दिला आहे. म्हणून लवकरच 5G दूरसंचार सेवांसाठी स्पेक्ट्रम (Spectrum) लिलावा होणार आहे. (हे ही वाचा:-Nitin Gadkari : पंतप्रधान मोदी आणि कायदे मंत्र्यांना मी अनेकदा सांगतो निर्णय देण्याचा अधिकार न्यायपालिकेचा : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी)

 

अंबानी आणि अदानी हे दोघेही गुजराती उद्योगपती असुन दोघांनीही मोठ्या व्यावसायिक समूहांची स्थापना केली आहे. मात्र, आजपर्यंत हे दोघही कोणत्याही व्यवसायात थेट आमने-सामने ल्याचं बघायला मिळालं नव्हतं.अंबानींचा व्यवसाय तेल (Oil), पेट्रोकेमिकल्सपासून (Petrochemical) दूरसंचार (Telecom) पर्यत तर अदानींचा बंदरांपासून कोळसा (Coal), वीज वितरण (Electricity) आणि विमानचालनापर्यंत विस्तार केला आहे.