Amazon Enters in Food Delivery Business | (Photo credit: archived, edited, symbolic images)

ऑनलाईन फूड डिलीवरी (Online Food Delivery) करणाऱ्या स्विगी (Swiggy), झोमॅटो (Zomato) कंपन्यांना आता अॅमेझॉन (Amazon) कंपनीच्या रुपात नवा पर्याय निर्माण होणार आहे. ई-कॉमर्स (E-commerce) कंपनी अॅमेझॉनने फूड डिलीवरी व्यवसायात उतरण्याचा निर्णय नुकताच घेतला. बंगळुरु आणि काही निवडक शहरांमध्ये अॅमेझॉन प्राथमीक स्वरुपात सेवा देत आहे. कंपनी पुढच्या महिन्यापासून ऑनलाईन फूड डिलीवरी सेवा विस्तारत आहे. अॅमेझॉन कंपनी फूड डिलीवरी व्यवसायात आल्यामुळे टेलीकॉम क्षेत्राप्रमाणे या क्षेत्रांमध्येही स्पर्धा वाढून ग्राहकांना त्याचा फायदा मिळू शकतो.

महत्त्वाचे म्हणजे फूड डिलीवरी व्यवसायात उतरण्याचा निर्णय अॅमेझॉन कंपनीने अशा काळात घेतला आहे, जेव्हा मार्केटमध्ये मातब्बर असलेल्या स्विगी, झोमॅटो आदी कंपन्यांनी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत कपात केली आहे. दुसऱ्या बाजूला उबरने फूड डिलीवरी व्यवसायातून आपला हात आकडता घेतला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही कंपन्या आपल्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या कंपन्यांनी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या डिस्काऊंटला (सवलती) मोठ्या प्रमाणावर कात्री लावली आहे.

अॅमेझॉन कंपनीने फूड डिलीवरी व्यवसायात दमदार पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी ग्रॉसरी, इलेक्ट्रॉनिक्स ते होम प्रोडक्ट च्या व्यवसायात पहिल्यापासूनच आहे. मात्र, फूड डिलीवरी व्यवसायात कंपनी पहिल्यांदाच पाऊल टाकत आहे. कंपनी प्राईम सदस्यांना काही विशेष सेवा देण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ई-कॉमर्स कंपन्या आणि ऑनलाईन डिलीवरी व्यवसायाच्या अभ्यांसकांनी नोंदवलेल्या निरिक्षणानुसार, कंज्यूमर टेक्नोलॉजी प्रोडक्ट्स बाबत बोलायचे तर, फूड डिलीवरी व्यवासायात ग्राहकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळताना दिसतो. फूड डिलीवरी नंतर ग्रॉसरी, एफएमसीजी आणि त्यानंतर इतर ई-कॉमर्स चा क्रमांक लागतो. (हेही वाचा, देशात आर्थिक मंदी असताना, Amazon देणार 10 लाख भारतीयांना रोजगार; जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात होईल नोकरभरती)

दरम्यान, आजवर इतर ई-कॉमर्स क्षेत्रात असलेल्या अॅमेझॉनचा फूड डिलीवरी व्यवसायातही आपला प्रवेश आणि उपस्थिती दर्शन्याचा प्रयत्न असू शकतो. कारण, या क्षेत्रात सर्वासामान्य जनता ते मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय लोकही सेवा घेतात. खास करुन शहरांमध्ये ऑनलाईन सेवा घेण्याचा वाटा मोठा आहे. त्यामुळे या क्षेत्रातही आपला ठसा उमटवण्याचा अॅमेझॉनचा विचार असू शकतो, असे अभ्यासक सांगतात. अॅमझॉन सुरुवातीला या क्षेत्रात 10 ते 15 टक्के कमीशन ऑफर करणार असल्याचे समजते.