Air India | (Photo Credits: Twitter)

एअर इंडिया (Air India) कंपनीचे विमान दिल्ली विमानतळावरुन (Delhi Airport) मुंबईच्या दिशेने निघणार होते. मात्र, या विमानास नियोजीत वेळेपेक्षा कैक तास उशीर झाल्याने प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला. परिणामी प्रवासी आणि एअर इंडिया कंपनीचे कर्मचारी यांच्यात विमानतळावरच जोरदार वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. या वादावादीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. एअर इंडिया कंपनीच्या विमानाने दिल्ली विमानतळावरुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशाच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एअर इंडियाचे AI-805 विमान नियोजित वेळेनुसार रात्री 8:00 ते 10:40 च्या हवेत झेपावणार होते. मात्र विमानाला मूळ वेळापत्रकापासून खूपच उशीर झाला. अखेर हे विमान रात्री 11:35 आणि 12:30 नंतर ते टेक ऑफ झाले.

संतप्त प्रवाशाने एएनआयकडे आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, विमानोड्डाणास प्रंचड उशीर झाला असतानाही केवळ प्रवाशांना मूर्ख बनविण्यासाठी प्रशासन त्यांना वाट्टेल त्या गोष्टी रचत आहे. अनेकदा पायलटच्या चुकीमुळे असे विलंब होता. पायलट अचानक अजारी पडला आणि खूप उशीराने विमानोड्डानासाठी विमानात बसणार होता. (हेही वाचा, Air India : विमान खरेदीची जगातील सर्वात मोठी डील; एअर इंडिया 470 विमाने खरेदी करणार)

दिल्ली विमानतळावरील टर्मिनल 3 वरुन एअर इंडियाचे विमान उड्डाण भरणार होते. मात्र, त्याला नियोजीत वेळे पेक्षा प्रचंड विलंब झाला. ज्यामुळे एअर इंडियाचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये जोरदार वादावादी झाली. एअर इंडियांच्या गलथानपणामुळे आमचे पुढचे कतारला जाणारे विमानही चुकल्याचे प्रवाशाने सांगितले. दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, विमानतळावर विमानाच्या उड्डाणास विलंब होणे हे प्रचंड वैतागवाणे होते. हा खूप वाईट अनुभव होता. विमानतळावर सुमारे 200 प्रवासी होते आणि विमान कंपनीकडून कोणतीही स्पष्टता नव्हती. रात्री 11:50 वाजेपर्यंत प्रवाशांना पाणीसुद्धा दिले गेले नाही," असा दावा दुसऱ्या एका प्रवाशाने केला.

व्हिडिओ

दरम्यान, तांत्रिक कारणामुळे विमानाला चार तास उशीर झाल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. सर्व प्रवाशांना जेवण देण्यात आले आणि त्यांची काळजी घेण्यात आली.