Air India : विमान खरेदीची जगातील सर्वात मोठी डील; एअर इंडिया 470 विमाने खरेदी करणार
Air-india-pixabay

टाटा समूहाच्या (Tata Group) एअर इंडियाकडून (Air India) 470 नवीन विमानांची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये फ्रांसच्या एअरबसकडून (Airbus) 250 नवीन एअरक्राफ्ट आणि अमेरिकेच्या बोईंगकडून (Boeing) 220 मोठी विमाने खरेदी करण्यात येणार आहे. हवाई वाहतुक क्षेत्रातली ही सर्वात मोठी डील आहे. एअर इंडियाला ताब्यात घेतल्यानंतर टाटा समुहाने व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. एअर इंडिया आणि एअरबस यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि फ्रांसचे राष्ट्रपती मॅक्रोन यांच्यात व्हर्चुअल बैठक झाल्यानंतर एअर इंडियाचा फ्रांसच्या ए्रअरबस सोबतचा करार झाला. हा अतिशय महत्त्वाचा करार असून भारत-फ्रांस यांच्यामधील भागीदारीचा ही महत्त्वाची उपलब्धी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. तर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) यांनी एअर इंडिया आणि बोईंगचा 220 विमानाचा करार झाल्याची घोषणा केली.

एअर इंडियाची मालकी टाटा समुहाकडे आल्यापासून कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल पहायला मिळत आहे. एअर इंडियाला भरारी देण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले असून एअर इंडियाच्या ताफ्यात नवीन विमानांचा भरणा केलेला देखील दिसून येत आहे. एअरबस – एअर इंडिया करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, रतन टाटा, फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन आणि एअरबसचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुइलाम फाउरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी मोदी आणि बायडेन यांच्यात फोनवरुन यासंदर्भात चर्चा झाली. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक मजबुत करण्यासाठी हा करार फार महत्त्वाचा ठरेल असे बायडन यांनी म्हटले.

व्हाईट हाऊस तर्फे एअर इंडिया आणि बोईंगमध्ये झालेल्या 220 विमानाच्या या कराराची माहिता देण्यात आली. हा करार तब्बल 334 बिलियन डॉलरचा असल्याची माहिती मिळत आहे. या करारात आणखी 50 विमाने खरेदी करण्याचा निर्णयाचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. एअर इंडियाने तब्बल 17 वर्षानंतर विमान खरेदीचा हा निर्णय घेतला आहे.