Air India | (Photo Credits: Facebook)

एअर इंडिया (Air India) कंपनीच्या विमानाला मस्कत (Muscat) विमानतळावर आग (Air India Express Flight Catches Fire at Muscat) लागली आहे. विमानात सुमारे 145 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मस्कत ते कोचीन असा प्रवाण करणाऱ्या IX-442 क्रमांकाचे एअर इंडियाचे AI Express B737 (VT AXZ) विमान उड्डाणासाठी हवेत झेपावणार होते. इतक्या त्याच्या एका इंजिनमधून धूर येत असल्याचे निदर्शनास आले.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेही (DGCA) या वृत्ताची पुष्टी केली आहे. विमानातील 2 क्रमांच्या इंजिन मध्ये धूर आढळून आल्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था केली जाईल. आम्ही घटनेची चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू, असेही डीजीसीएने म्हटले आहे. (हेही वाचा, Air India: एअर इंडियाचे विमान एमरजन्सी डायवर्ट, पायलटच्या तक्रारीमुळे मुंबईत सुरक्षीत लँडींग)

ट्विट

मस्कत विमानतळावर ही दुर्घटना बुधवारी (14 सप्टेंबर) रोजी घडली. मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानातून धूर निघू लागल्याने सर्व प्रवाशांना मस्कत-कोचीन एअर इंडिया एक्स्प्रेस विमानातून बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी प्राथमिक माहिती देताना सांगितले की, सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आल आहे. बाहेर काढलेल्या 141 प्रवाशांमध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. कोणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षीतपणे टर्मिनल बिल्डिंगमध्ये नेण्यात आले आहे. पुढील कार्यवाही सुरु आहे.