DBS Bank मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर आता Lakshmi Vilas Bank चे खातेदार सर्व सेवांचा उपभोग घेऊ शकतात; जाणून घ्या काय असेल Interest Rates
Lakshmi Vilas Bank Merger with DBS India (Photo Credits: Wikimedia Commons)

लक्ष्मीविलास बँक (LVB) आता डीबीएस बँक इंडिया लिमिटेडमध्ये (DBS Bank) विलीन झाली आहे. डीबीएस बँक ही सिंगापूरच्या डीबीएस ग्रुप होल्डिंग्स लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे. विलीनीकरणानंतर, डीबीएस बँकेने म्हटले आहे की लक्ष्मीविलास बँकेचे सर्व विद्यमान कर्मचारी आता डीबीएस बँक इंडिया लिमिटेडचे ​​कर्मचारी असतील. त्यांच्यासाठी सर्व नियम व अटी लक्ष्मीविलास बँकेच्या अनुसार असतील. डीबीएस बँक इंडियाचे म्हणणे आहे की, लक्ष्मी विलास बँकेचे ग्राहक आता सर्व बँकिंग सेवेचा उपयोग करु शकतात. बँकेने सांगितले की सेविंग आणि फिक्स्ड डिपॉझिटवर व्याज दरामध्ये कोणताही बदल होणार नाही.

डीबीएस बँक इंडियामध्ये एलव्हीबीचे विलीनीकरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सरकारच्या विशेष हक्क आणि बँकिंग नियमन 1949 च्या कलम 45 अंतर्गत, 27 नोव्हेंबरपासून लागू झाले. 27 नोव्हेंबर रोजी आरबीआयकडून लक्ष्मीविलास बँकेवर लादलेला मोटोरियम काढून घेण्यात आला, त्यानंतर सर्व शाखा, डिजिटल चॅनेल आणि एटीएमद्वारे सर्व बँकिंग सेवा पूर्ववत झाल्या. त्यानंतर लक्ष्मी विलास बँकेचे सर्व विद्यमान ग्राहक नेहमीप्रमाणे सर्व बँकिंग सेवा घेऊ शकतात. (हेही वाचा: Lakshmi Vilas Bank च्या ग्राहकांचे पैसे सुरक्षित; RIB नियुक्त प्रशासकांचा ठेवीदारांना दिलासा)

डीबीएस बँने सांगितले की, ग्राहकांना बचत खाते आणि मुदत ठेवीवरील व्याज दर लक्ष्मीविलास बँकेने निश्चित केलेल्या दरावर असेल. यामध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी ग्राहकांना माहिती देण्यात येईल. तसेच येत्या काही महिन्यांत एलव्हीबीच्या यंत्रणेला व नेटवर्कला डीबीएस बँकेत समाकलित करण्यासाठी डीव्हीएस संघ एलव्हीबी कर्मचार्‍यांशी जवळून  करेल. एकदा एकत्रीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर, ग्राहकांना त्यानंतरपासून इतर विविध उत्पादने आणि सेवांचा लाभ मिळण्यास प्रारंभ होईल.

डीबीआयएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरोजित शोमे म्हणाले, ‘एलव्हीबीच्या विलीनीकरणामुळे आम्ही एलव्हीबीचे ठेवीदार आणि कर्मचार्‍यांना स्थिरता प्रदान करू शकलो. यामुळे ज्या ठिकाणी सध्या आमचे ग्राहक नाहीत अशा मोठ्या शहरांपर्यंत आणि इतर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. बँकेने सांगितले की, आमच्याकडे पुरेसे भांडवल आहे आणि विलीनीकरणानंतरही भांडवली वाढ प्रमाण (CAR) नियामक आवश्यकतांपेक्षा जास्त राहील. याव्यतिरिक्त, डीबीएस ग्रुप डीबीआयएलमध्ये 2,500 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करेल, जेणेकरून विलीनीकरण सहजपणे पूर्ण होऊ शकेल आणि बँकेला भविष्यात वाढ मिळेल.