Fuel Price Hike in India: इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेल, LPG नंतर आता CNG आणि PNG महागले, जाणून घ्या नवे दर
Image Used for Representational Purpose Only (Photo Credits: ANI)

Fuel Price Hike: इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना पुरता हवालदिल झाला आहे. पेट्रोल, डिझेल, (Petrol-Diesel Price Hike) एलपीजी गॅसनंतर आता CNG आणि PNG चे दर वाढले आहे. दिल्लीत सीएनजी गॅस 70 पैशांनी तर पीएनजी (पाइप्ड नॅचरल गॅस) 91 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.आज सकाळी 6 वाजल्यापासून दर लागू करण्यात आले आहे. या इंधनदरवाढीमुळे जनतेला खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने सांगितले की, CNGची किंमत 43.40 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी 819 रुपये मोजावे लागणार आहे. 24 फेब्रुवारीला एलपीजी गॅसच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. एका महिन्यात चौथ्यांदा वाढ झाल्याने केवळ तीन आठवड्यातच सिलेंडरच्या किंमतीत एकूण 100 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.

हेदेखील वाचा- LPG Gas Price Hike: एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ, 25 रुपयांनी महागल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री

दरम्यान पेट्रोल, डिझेलचे दर हळू हळू शंभरीकडे चालले आहेत. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल दर 97.57 रुपयांवर पोहोचलं आहे, तर डिझेलचे दर 88.60 रुपये झाले आहे. तर नवी दिल्लीत पेट्रोल 91.17 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल 81.47 रुपये लीटर इतके झाले आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती तपासून पाहण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीची वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. येथे कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात नवे दर जाहीर केले जातात. त्यामुळे तुम्ही सुद्धा https://iocl.com/Products/IndaneGas.aspx वर नवे दर तपासून पाहू शकतात. येथे तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या किंमती कळू शकणार आहेत.