LPG Gas Price Hike: मार्च महिना आज पासून सुरु झाला आहे. तर महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली असून एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गॅसच्या किंमती 25 रुपयांनी वाढल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ झाली होता. यापूर्वी 25 फेब्रुवारीला सुद्धा एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. दरम्यान, 4 फेब्रुवारीला 25 रुपये, 14 फेब्रुवारीला 50 रुपयांची गॅसच्या किंमतीत वाढ झाली होती. त्याचसोबच 25 फेब्रुवारीला सुद्धा 25 रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले होते.(महत्त्वाचे! 1 मार्च हा दिवस ठरणार घडामोडींचा, आजपासून होणार 'हे' महत्त्वाचे बदल)
आज पुन्हा एकदा 14.2 किलोग्रॅम असणाऱ्या नॉन सब्सिडी एलपीजी गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला आहे. किंमतीत वाढ झाल्याने दिल्लीत त्याचे दर 794 रुपायांनी वाढून 819 रुपये झाली आहे. मुंबईत नवी किंमत 819 रुपये, कोलकाता मध्ये 845.50 रुपये आणि चैन्नईत 835 रुपये एलपीजीचे दर झाले आहेत. जानेवारी महिन्यात ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतीत कोणताही बदल केला नव्हता. पण डिसेंबर महिन्यात दोन वेळेस 50-50 रुपयांनी वाढ केली होती.
तर 19 किलोग्रॅम असणाऱ्या कमर्शिअल गॅस सिलिंडरचे दर 90.50 रुपयांमध्ये वाढ झाली आहे. आता दिल्लीत याच सिलिंडरच्या किंमती 1614 रुपये झाल्या आहेत. यापू्र्वी याची किंमत 1523.59 रुपये प्रति सिलिंडर होती. तर मुंबईत आता 1563.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. कोलकाता मध्ये ही किंमत 1681.50 रुपये आणि चेन्नईत 1730.5 रुपये झाली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती तपासून पाहण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीची वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. येथे कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात नवे दर जाहीर केले जातात. त्यामुळे तुम्ही सुद्धा https://iocl.com/Products/IndaneGas.aspx वर नवे दर तपासून पाहू शकतात. येथे तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या किंमती कळू शकणार आहेत.