महत्त्वाचे! 1 मार्च हा दिवस ठरणार घडामोडींचा, आजपासून होणार 'हे' महत्त्वाचे बदल
7th Pay Commission | (Photo courtesy: archived, edited, Symbolic images)

प्रत्येक महिन्याची 1 तारीख आली की राज्यात, देशात अनेक महत्त्वाचे बदल होतात.

त्याप्रमाणे आजही अनेक घडामोडी घडणार आहे. बँक, रिक्षा-टॅक्सी भाडे (Auto-Taxi Fare), FASTag, KYC याबाबत अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी तसेच आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी या महत्त्वाच्या बदलांची माहिती करुन घ्या. कारण असे न केल्यास तुमची काही कामे खोळंबून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व नियम तुम्हाला माहित असण्याची गरज आहे. त्याचबरोबर आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरु होणार आहे.

बँकबाबत महत्त्वाचे नियम

- सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेच्या कोणत्याही एटीएम मधून ग्राहकांना 2 हजार रुपयांची नोट मिळणार नाही आहे. मात्र ग्राहक बँकेच्या काउंटवरुन 2 हजारांची नोट घेऊ शकतात. इंडियन बँकेने असे म्हटले आहे की, एटीएम मधून पैसे काढल्यानंतर ग्राहकांना 2 रुपयांचे सुट्टे मिळण्यासाठी बँकेत येतात. त्यामुळेच तत्काळ 2 रुपयांच्या नोटा एटीएम मधून दिल्या जाणार नाहीत.हेदेखील वाचा- Rules Changing From 1st March: 1 मार्च पासून देशभरात 'हे' होणार बदल, सामान्य व्यक्तीच्या खिशावर होणार परिणाम

एसबीआयच्या ग्राहकांसाठी KYC अनिवार्य

1 मार्च पासून स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या युजर्सला केवायसी (KYC) करणे अनिवार्य असणार आहे. असे न केल्यास खातेधारकांचे अकाउंट बंद केले जाणार आहे. यासाठी एसबीआय ग्राहकांना आपले अकाउंट अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी केवायसी जरुर पूर्ण करावी.

टोल प्लाझावर मोफत मिळणार नाही FASTAG

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) यांनी असे म्हटले आहे की, 1 मार्च पासून देशभरातील टोल प्लाझावर फास्टॅग खरेदी करण्यासाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत. म्हणजेच 28 फेब्रुवारीनंतर मोफत फास्टॅग खरेदी करण्याची सुविधा बंद केली जाणार आहे.

मुंबईत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ

रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरून 25 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काल मध्यरात्रीपासून हे दर लागू झाले आहेत.