हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर (Hindenburg Report) उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी उद्योग समूहाबद्दल सुरु झालेली चर्चा थांबण्याचे अद्यापही नाव घेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील जवळकीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही संसदेत या आधी आवाज उठवला आहे. आता याच मुद्द्यावरुन विरोध जोरदार आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (joint parliamentary committee) द्वारे चौकशी व्हावी अशी मागणी लावून धरली आहे. याच मुद्द्यावरुन संसदेमध्ये विरोधक आक्रमक झाले. दरम्यान, लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यानच्या काळात विरोधकांनी अदानी प्रकरणाची चौकशी जेपीसी द्वारे करावी अशी मागणी करत संसदेमध्ये घोषणा देत पोस्टही झळकावले.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता दुसरा टप्पा पार पडत आहे. दरम्यान, सरकारला अधिवेशनात या वेळी सुरुवातीपासूनच सूर न गवसल्याचे चित्र आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागत आहे. आजही सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरु झाले. मात्र, अवघ्या काही वेळातच ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. (हेही वाचा, Hindenburg Report Case: हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलीने तज्ज्ञ समिती; SEBI ला 2 महिन्यांत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश)
लोकसभा सभागृहाचे कामकाज सकाळी 11.00 वाजता सुरु झाले तेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याची घोषणा केली. दरम्यान विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधी सदस्यांनी सभागृहात अध्यक्षांसमोरील हौदात जाऊन अदानी समूहाविरुद्ध फसवणूक आणि साठेबाजीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिरला यांना कामकाज चालवणे अशक्य झाल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत सभागृहकाचे कामकाज स्थगित करावे लागले.
ट्विट
Delhi | Opposition MPs protest on the first floor of the Parliament and demand a JPC inquiry into the Adani Group issue. pic.twitter.com/7HOfO8nBFS
— ANI (@ANI) March 21, 2023
दरम्यान, वाचकांच्या माहितीसाठी असे की, 13 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरू झाल्यापासून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब होत आहे. एकाच अधिवशनात सभागृह (दोन्ही) वारंवार तहकुब होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.