Nashik Accident: राज्यात अपघाताचे सुत्र सुरुच आहे. दरम्यान नाशिकमधून एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या चांदवडजवळ मुंबई आग्रा महामार्गावर एका खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. या अपघातात 14 जण जखमी झाले आहे तर दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी प्रवाशांना जवळच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा- छत्रपती संभाजीनगर येथे भरधाव ट्रकने 13 वाहनांना दिली धडक)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या चांदवडजवळ खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १४ प्रवाशी जखमी झाले आहे. ट्रॅव्हर्स बस अनियंत्रित झाल्याने अपघात झाला आहे. १४ प्रवाशी जखमी झाले असून त्यातील दोन जण गंभीर जखमी झाले आहे. बसमध्ये १८ प्रवाशी प्रवास करत होते. ही बस मध्य प्रदेशातून मुंबईकडे जात होती.
ट्रॅव्हर्स बस आग्रा महामार्गावरून जात होती दरम्यान, पहाटेच्या वेळी दाट धुक्यामुळे वाहनं चालकाला समोरचं काही दिसत नव्हतं, त्यामुळे चालकाने गाडीवरील नियत्रंण सुटलं आणि हॉटेल माथेरान जवळ बस पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्या सध्या चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघात तपासले. या अपघातात बस चक्काचूर झाले आहे.