Kanchanwadi Accident: सोलापूर- धुळे महामार्गावरील कांचनवाडी येथील वाल्मीजवळ एका भरधाव ट्रकने १३ वाहनांना धडक दिली. या धडकेत भीषण अपघात घडून आला. या अपघातात एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाला. तर या अपघातात १५ जण जखमी झाले असून चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर येत आहे. जखमींवर शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. भरधाव ट्रक अनियंत्रित झाल्याने वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की 13 वाहनांना धडक लागली. ही घटना शुक्रवारी घडली. अपघातानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. अपघातस्थळी पोलिस अधिकारी दाखल झाले आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत होते. या अपघातात अनेक वाहनांचे चक्काचूर झाला आहे. खराब झालेली वाहने रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आली. त्यानंतर 11.30 वाजता वाहतूक सुरळीत झाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)