Aarogya Setu App: कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सरकारने लाँच केलेल्या 'आरोग्य सेतु अ‍ॅप'चे WHO कडून कौतुक; जाणून घ्या काय म्हणाले Tedros Adhanom Ghebreyesus
Aarogya Setu App (Photo Credits: Twitter/@SetuAarogya)

देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) आढावा घेणे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणे सोबतच इतरांना सतर्क करणे यासठी भारत सरकारने आरोग्य सेतु अ‍ॅप (Aarogya Setu App) सादर केले होते. देशातील 15 कोटी वापरकर्ते आरोग्य सेतु अ‍ॅप वापरत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने एखादे अ‍ॅप डाउनलोड करणे हा फार मोठा रेकॉर्ड आहे. आता या अ‍ॅपचे वैशिष्ट्य आणि लोकप्रियतेची जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रशंसा केली आहे. कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यात आरोग्य सेतु अ‍ॅपने मोठी भूमिका बजावली आहे व आता डब्ल्यूएचओचे महासंचालक Tedros Adhanom यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे.

याबाबत बोलताना Tedros Adhanom म्हणाले, 'भारतामधील आरोग्य सेतू अ‍ॅप  जवळजवळ 15 कोटी लोकांनी डाउनलोड केले आहे. या अ‍ॅपने शहर सार्वजनिक आरोग्य विभागांना मोठी मदत केली आहे. या अ‍ॅपमुळे क्लस्टर क्षेत्राची माहिती मिळण्यास व त्यानुसार लक्ष्यित मार्गाने चाचणी विस्तृत करण्यास मदत मिळाली आहे.' आरोग्य सेतु अ‍ॅप लाँच होऊन आता 6 महिने झाले आहेत. हे कोरोना कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग अॅप आहे, ज्याच्या मदतीने आपल्याला समजू शकते की, तुमच्या परिसरात सुमारे किती संक्रमित लोक आहेत आणि अॅप वापरणार्‍या व्यक्तीला संसर्गाचा कितपत धोका आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरसदरम्यान शाळा बंद राहिल्याने भारताला होऊ शकते 40 अब्ज डॉलर्सचे नुकसान; विद्यार्थ्यांचा फार मोठा तोटा- World Bank)

एएनआय ट्वीट -

केंद्र सरकारने अनेक ठिकाणी आरोग्य सेतु अ‍ॅपचा वापर अनिवार्य केला आहे. कार्यालय, रेल्वे किंवा हवाई प्रवास किंवा खरेदी दरम्यान आरोग्य सेतु अॅप आपल्या फोनमध्ये असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅप हे कोरोना व्हायरसने संसर्ग झालेल्या लोकांच्या त्वरित ओळखण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. दरम्यान, धारावीत कोरोना संक्रमण कमी झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने धारावी मॉडेलचे कौतुक केले होते. याशिवाय आता जागतिक बँकेनेदेखील (World Bank) मुंबईतील धारावी येथे कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या उपायांचे कौतुक केले आहे.