Aadhar Card : आधार कार्डच्या वैधतेचा कालवधी किती? जाणून घ्या महत्वाच्या टीप्स
आधार कार्ड (Photo Credits: File Photo)

बारा वर्षापूर्वी म्हणजे 2010 पासून भारतात आधार कार्ड (Aadhar Card) या नव्या ओळखपत्राला कामकाजात सुरुवात झाली. आज ते विविध कारणांसाठी वापरले जाते.  शाळेत प्रवेश मिळवण्यापासून नोकरी, व्यवसाय, सरकारी योजनांचा लाभपर्यत विविध बाबातीत आधार कार्डचा वापर केला जातो.आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे. या कार्डची प्रत्येक भारतीय नागरिकास एक विशेष उपयुक्तता आहे. आज भारतातील जवळपास सर्व लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे. आधार कार्ड प्रत्येकाकडे असणं बंधनकारक आहे.

 

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयाचं हक्काचं ओळखपत्र असुन त्याची वैधता कधीही संपत नाही. आधार कार्डचं नुतणीकरण करण्याची काहीही गरज नाही. आधार कार्ड धारकाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तो संपूर्ण आयुष्यभर आधारकार्ड विना नुतणीकरण सहजरीत्या वापरु शकतो.  आधारकार्डची  वैधता ही त्या आधार कार्ड धारक व्यक्तीच्या मृत्यूबरोबर संपते. आधार कार्ड धारकाच्या मृत्यूनंतरच आधार कार्ड अवैध होतं. (हे ही वाचा :-Mamata Banerjee on Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात सत्ता जिंकली जनतेचं मन नाही: ममता बॅनर्जी)

 

बँक खाते (Bank Account),डिमॅट खाते (Demat Account), डिजी लॉकर (DG Locker), ओटीपी (OTP) सुरक्षेसाठी भारतीय नागरिकाकडे आधारकार्ड असणे अनिवार्य आहे.  पाच वर्षापेक्षा अधिक वय असणारा प्रत्येक भारतीयाकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे. पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या छोट्या मुलांचं ब्लू कार्ड (Blue Card) असतं आणि हा मुलाचं वय 5 वर्षापेक्षा अधिक झाल्यास त्याचं आधारकार्ड तयार करुन घेणं आवश्यक असते.

 

आजकाल सर्व गोष्टी आधार कार्डशी लिंक गरजेच झालं आहे. जर एखाद्याला  तुमच्याआधार क्रमांकाबद्दल माहिती मिळाली तर तो त्याचा गैरवापर देखील करू शकतात. हे  टाळण्यासाठी व्हर्चुअल आयडी (Virtual ID) हा पर्याय आहे. हा आयडी देखील 16 क्रमांकाचा असतो. हा आयडी बँकिंगपासून सर्व प्रकारच्या सुविधांसाठी वैध मानला जातो. हा आयडी तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे हवा तसा बदलू शकता.