Mamata Banerjee on Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात सत्ता जिंकली जनतेचं मन नाही: ममता बॅनर्जी
Mamata Banerjee (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर बोलताना ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) हे सरकार अवैध असुन ही भाजपची खेळी असल्याचं टीका ममता दिदींनी इंडिया टुडेच्या (India Today) मुलाखती दरम्यान केली आहे. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात फक्त सत्ता जिंकली जनतेचं मन नाही असा खोचक टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) नवनिर्वाचीत सरकारला लगावला आहे.

ममता म्हणाल्या भाजपने आपल्या केंद्रातील सत्तेचा महाराष्ट्रात गैरवापर केला आहे. भाजपने मनी पावर (Money ), ईडी(ED) पावर, सीबीआय (CBI) पावरच्या जोरावर सत्ता जिंकली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासुन सत्ता नाट्य रंगल आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त झालं असुन राज्यात पुन्हा नवं सरकार आलं आहे. विविध राष्ट्रीय नेते महाराष्ट्रातील या सत्तातरावर प्रतिक्रीया देत आहेत. कॉंग्रेस (Congress), तृणमुल कॉंग्रेस (TMC), आम आदमी पार्टी (AAP), समाजवादी पार्टीतील (SP) अनेक बड्या नेत्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

महाविकास आघाडी सत्तेत असतानाही ममता बॅनर्जी कायम महाराष्ट्र सरकारला पाठींबा देताना दिसल्या. आता सरकार पडल्यानंतरही त्यांनी उध्दव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) समर्थनात दिलेली ही प्रतिक्रीया  राजकीय दृष्ट्या महत्वाची आहे.