महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना घरूनच शुभेच्छा देण्याचे केले आवाहन; 9 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Jan 09, 2021 11:49 PM IST
लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आलेली मुंबई रेल्वे लवकरच सुरु केली जाणार आहे. हा निर्णय येत्या मंगळारपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी दिली. त्यामुळे मुंबई करांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने हा निर्णय लवकर जाहीर केल्यास अत्यावश्यक सेवेत नसलेल्या नागरिकांनाही मुंबई लोकलने प्रवास करता येणार आहे.
केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेती कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या या संघर्षावर अद्यापही तोडगा निघाला नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करते आहे. परंतू, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात सुरु असलेली चर्चेची आठवी फेरीही निष्फळ ठरली आहे. आता पुन्हा येत्या 15 जानेवारीला नववी बैठक होणार आहे. दरम्यान, न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांमध्ये शेती हा विषय राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे त्याबाबत कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. या याचिकांवर येत्या 11 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
भंडारा जिल्ह्यासाठी शनिवारची पाहाट काळरात्र ठरली. रात्रीच्या नीरव अंधारात सर्व काही निद्राधीन असताना काळाने घाला घातला. भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला आग लागली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजनेच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद हे समिकरण जुने झाले आहे. यंदाच्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनावरुनही वाद पाहायला मिळाला. हा वाद संमेलनाच्या स्थळावरुन होता. संमेलन दिल्ली की नाशिक असा हा वाद होता. अखेर 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे नाशिक येथेच घेण्यात येईल असे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
दरम्यान, राजकारण, अर्थकारण, सामाजकारण, संस्कृती, कृषी आरोग्य, संशोधन, उद्योग यांसह जगभरातील घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग पाहात राहा. लेटेस्टली सोबत जोडलेले राहा.