7th Pay Commission: जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 4% ने वाढण्याची शक्यता; पगारात मिळू  शकते 10,000 रूपयांपर्यंत वाढ!
Cash | (Archived, edited, representative images) (Photo Credits : IANS)

Central Government Employee DA Hike:   केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी नवंवर्ष 2020 मध्ये पगारवाढीचं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात पुन्हा 4% महागाई भत्ता (Dearness Allowance) म्हणजे DA वाढण्याची शक्यता आहे. सध्या महागाई दराचा आकडा पाहता केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात 10,000 रूपयांपर्यंत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई भत्ताचं समीकरण जुळून आलं तर सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात सुमारे 720 ते 10,000  रूपयांची वाढ होऊ शकते. 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या निवृत्ती वयाबाबत मोदी सरकारचा दिलासादायक निर्णय; 33 वर्षांची नोकरी किंवा वयाच्या साठीत रिटायरमेंट नाही.

 दरम्यान 2016 साली सातवं वेतन आयोग लागू केल्यानंतर महागाई भत्ता देणं बंद करण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर दर सहा महिन्यांनी सरकार AICPI च्या आकडेवारीनुसार, डीए म्हणजे महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला जातो. दरम्यान जानेवारी ते जून 2019 मध्ये AICPI (All India Consumer Price Index) इंडेक्सनुसार सर्वाधिक महागाई भत्त्यातील वाढ देण्यात आली होती. केंद्रीय कर्मचार्‍यांना 5% वाढ दिली. ही वाढ मागील 3 वर्षातील सर्वाधिक वाढ होती. त्यामुळे आता सरकारी कर्मचार्‍यांना 17% महागाई भत्ता दिला जातो. 7th Pay Commission: मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना 'किमान वेतन वाढ' प्रस्तावाला मंजुरी देत नववर्षाची भेट देणार?

सरकारने आता जुलै 2019 ते ऑक्टोबर 2019 मधील मागाईचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार AICPI मध्ये हा आकडा 325 वर आहे. सप्टेंबर मध्ये यात 3 पॉईंटने वाढ झालेली आहे. डिसेंबर 2019 मध्ये AICPI-325 (संभावित) आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता 17% वरून 21.17% होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.