7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचार्यांच्या मूळ वेतनाच्या वाढीबाबत अद्याप कॅबिनेट मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले नसले तरीही आज मोदी सरकारने लाखो केंद्रीय कर्मचार्यांना खूषखबर दिली आहे. मागील काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचार्यांचे निवृत्ती वय 60 वरून 58 करण्याची चर्चा रंगली होती. मात्र आज मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्यांचे निवृत्तीचे वय 60 कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत आज हा संभ्रम दूर केला आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत लेखी उत्तरात माहिती दिली आहे. 7th Pay Commission: सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार TA मध्ये होऊ शकते वाढ; जाणून घ्या सविस्तर वृत्त
सोशल मीडीयावर मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार केंद्रीय कर्मचार्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष किंवा 33 वर्ष कामाची पूर्ण असलेला कर्मचारी निवृत्त होणार अशा प्रकारची माहिती व्हायरल केली जात आहे. तसेच हा निर्णय 2020 पासून नव्या आर्थिक वर्षात अंमलात आणला जाणार आहे अशा प्रकारची माहितीदेखील देण्यात आली आहे. 7th Pay Commission: सातवे वेतन आयोगाच्या अंतर्गत ग्रॅज्युटी नियमात बदल; लाखो कर्मचाऱ्यांना मिळतोय अधिक फायदा.
केंद्रीय कर्मचार्यांच्या नियमांनुसार, सरकारला वेळेआधी अधिकार्यांच्या निवृत्तीचा अधिकार आहे. ग्रुप 'ए' किंवा ग्रुप 'बी', स्थायी अथवा अस्थायी स्वरूपात सेवेत असलेले आणि वयाच्या पस्तीशी आधी रूजू झालेले आणि 50 पेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना या तरतुदी लागू आहेत.
केंद्रीय कर्मचार्यांचे निवृत्ती वय 1998 साली 58 वरून 60 वर्ष करण्यात आला आहे. त्यानंतर अनेक राज्य सरकार कडून निवृत्ती वय 60 वरून 62 करण्यात आली आहेत.
2014 साली स्थापन करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार कर्मचार्यांना वेतन आणि इतर मासिक भत्ते देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.मागील महिन्यातच केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता 12% वरून 17% करण्यात आला आहे.