COVID 19 ची नोकरदारांवर आर्थिक कुर्‍हाड; एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये बंद झाली 71 लाखापेक्षा अधिक EPF accounts
EPFO Office (Photo Credits-Facebook)

कोरोना संकटाला आता वर्षपूर्ती झाली आहे मात्र अद्याप त्याचा धोका टळलेला नाही. जगभरातील अर्थव्यवस्थेवर कोरोना संकट आणि लॉकडाउनचा प्रभाव दिसला आहे. भारतामध्येही नोकरदार वर्गाचे कंबरडे कोविड 19 संकटामुळे पार मोडून निघाले आहे. केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार (Minister of Labour and Employment Santosh Kumar Gangwar) यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार, कोरोना संकटकाळामध्ये एप्रिल ते डिसेंबर 2020 दरम्यान सुमारे 6.5% पीएस अकाऊंट्स बंद झाली आहेत. ईपीएफओ च्या माहितीनुसार या काळात 71 लाखाहून अधिक पीएफ अकाऊंट्स बंद झाली आहेत. यावरूनच नोकरदार वर्गाला कोरोना संकटाचं किती नुकसान झालं असेल याचा अंदाज येऊ शकतो. EPFO WhatsApp Helpline Service: आता व्हॉट्सअ‍ॅप वर थेट मिळणार पीफ धारकांना मदत; इथे पहा वांद्रे, ठाणे, पुणे सह देशभरातील रिजनल ऑफिसचा हेल्पलाईन नंबर.

ईपीएफओ च्या माहितीनुसार, मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार, नोकर्‍या गेल्या. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्गाला बसला. सरकारी आकड्यांनुसार पीएफ अकाऊंट्स बंद होण्याचा एकूण आकडा 70 लाखाच्या पार गेला आहे. 2020 पूर्वी ईपीएफओ मध्ये 6 कोटी रजिस्टर्ड खाती आहेत. यापैकी 66.7 लाख पेक्षा अधिक खाती अशी आहेत जी 2019-20 मध्ये जोडली गेली होती. फक्त कोरोना काळातच त्यापैकी 6.5% खाती बंद झाली आहेत. PF Benefits: नोकरी सोडल्यावर किंवा बदली केल्यावर लगेच पीएफ मधील पैसे का काढू नये?

एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये सुमारे 71,01,929 अकाऊंट्स बंद झाली आहेत. तर त्याआधी 2019 मध्ये याच काळात 66,66,563 अकाऊंट्स बंद झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक अकाऊंट्स ऑक्टोबर 2020 मध्ये 11,18,751 बंद झाली तर त्या खालोखाल 11,18,517 अकाऊंट्स सप्टेंबर महिन्यात बंद झाली आहेत.

कोरोना काळात लोकांनी केवळ पीएफ अकाऊंट्स बंद केलेली नाहीत तर या काळात सुमारे 33% लोकांनी आपल्या पीएफ अकाऊंट मधून पैसे काढून आपला खर्च भागवला आहे. अनेकांच्या अचानक नोकर्‍या गेल्याने त्यांना अशाप्रकारे उदरनिर्वाह करावा लागला आहे. ईपीएफ अकाऊंट्स अनेक कारणांमुळे बंद होऊ शकतात. यामध्ये रिटायर्टमेंट, नोकरी जाणं, नोकरीत ट्रान्सफर होणं अशी कारणं असू शकतात. कोरोना वायरस लॉकडाऊन चा काळ अनेकांसाठी क्लेषदायक आहे. या काळात अनेकांच्या नोकर्‍यांवर कुर्‍हाड पडली आहे ज्यामुळे त्यांना पीएफ अकाऊंट मधील पैशांना हात लावावा लागला आहे.